ETV Bharat / state

... म्हणून गॅंग प्रमुखाच्या नादाला लागू नका'; गुलाबराव पाटलांचा मुनगंटीवारांना टोला - जळगाव गुलाबराव पाटील बातमी

गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते', हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले, अशा शब्दांत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

Gulabrao Patil replied to Sudhir Mungantiwaran after  his comment on uddhav thackrey speech in jalgaon
... म्हणून गॅंग प्रमुखाच्या नादाला लागू नका'; गुलाबराव पाटलांचा मुनगंटीवारांना टोला
author img

By

Published : Jun 20, 2021, 7:20 PM IST

जळगाव - 'शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. त्या गँग प्रमुखाच्या बापाने काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते', हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले, अशा शब्दांत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

प्रतिक्रिया

हेही वाचा - काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार, आघाडी कायमस्वरुपी नाही - पटोले

गुलाबराव पाटीलांचे मुनगंटीवारांना प्रत्युत्तर -

शिवसेनेचा काल वर्धापन दिन साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाषण केले होते. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. 'हे सत्ता प्रमुखाचे नव्हे, तर गँग प्रमुखाचे भाषण आहे', असे त्यांनी म्हटले होते. त्यावर आता शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुढे बोलताना 'सुधीर मुनगंटीवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. शिवसेना प्रमुखांचे पुत्र गँगप्रमुख आहेतच. ते आम्ही मान्य करतो. ते शिवसेनेचे गँगप्रमुख आहेत. तुमच्या गँगप्रमुखांची काय कामे चालू आहेत? हे आम्हाला चांगले माहिती आहे. त्यामुळे कृपा करून शिवसेनेच्या नादी लागू नये', असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून किरीट सोमैयांची बोचरी टीका, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.