ETV Bharat / state

Gulabrao Patil clarification on controversial statement : अभिनेत्रीचा गाल सोडला व ओम पुरीचा गाल पकडला - गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील वादग्रस्त वक्तव्य

शिवसेना नेते गुलाबराव पाटील ( Shivsena leader Gulabrao Patil ) म्हणाले, की खराब रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न आहे, असे माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. कुणाचेही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. मागील भाषणावेळी माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. ते सांगण्याचा माझा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया देत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ( Controversial statement of Gulabrao Patil ) सारवासारव केली आहे.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील
शिवसेना नेते गुलाबराव पाटील
author img

By

Published : Feb 12, 2022, 9:21 PM IST

Updated : Feb 12, 2022, 9:36 PM IST

जळगाव - रस्त्यांबाबत अभिनेत्रीचे नाव घेवून चुकीचे बोलून गेलो. त्यामुळे आता तो गाल सोडला. ओम पुरीचा गाल पकडला आहे. त्यामुळे ओम पुरीच्या गालावर कोणी टीका करू नये, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil on road Development ) यांनी केले. ते भुसावळ येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ( Bhusaval road work ) केले आहे.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील ( Shivsena leader Gulabrao Patil ) म्हणाले, की खराब रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न आहे, असे माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. कुणाचेही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. मागील भाषणावेळी माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. ते सांगण्याचा माझा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया देत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ( Controversial statement of Gulabrao Patil ) सारवासारव केली आहे.

हेही वाचा-Ajit Pawar on Kirit Somaiya : किरीट सोमैयांच्या आरोपावर अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदाच असेच वक्तव्य केले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, की निवडणूक लागली की मतदार सकाळी शिवसेनेचे मटन खातात. दुपारी भाजपची शेव भाजी खातात. रात्री काँग्रेसचे जेवण घेतात. मतदार कुणाचे मटन खातात आणि कोणाचा बटन दाबतात ते समजत नाही, अशी प्रतिक्रियाही शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

मागील भाषणावेळी माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला

हेही वाचा-Raosaheb Danve On Railway Food : रेल्वेत यापुढे मिळणार शिजवलेले अन्न - रावसाहेब दानवे

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
महाराष्ट्रात डिसेंबर 2021 मध्ये नगरपंचायत निवडणुकीची ( Nagar Panchayat elections in Jalgaon ) रणधुमाळी सुरू असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Shivsena Leader Gulabrao Patil ) यांनी एकनाथ खडसे यांना बोदवड नगरपंचायत ( Bodwad Nagar Panchayat Election ) प्रचारभरसभेत टोला मारला होता. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे ( Roads like Hema Malini's Cheeks ) असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना आव्हान आहे. त्यांनी मतदारसंघात येऊन मी केलेला विकास पहावा. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी तयार केले आहे. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवालदेखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यावर भाजप व इतर महिला नेत्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा-राज्याला दिलासा! शनिवारी 4 हजार 359 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 32 दगावले

Last Updated : Feb 12, 2022, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.