ETV Bharat / state

भागपूर प्रकल्पाचा भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश - Bhagpur upsa sinchan jalgaon

जिल्हाधिकारी कार्यालयात भागपूर उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, भूसंपादन अधिकारी शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, किरण सावंत-पाटील, कार्यकारी अभियंता कडलग आदि उपस्थित होते.

आढावा बैठक
आढावा बैठक
author img

By

Published : May 7, 2021, 4:54 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती येण्याची गरज आहे. यासाठी या प्रकल्पाचा भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने मार्गी लावावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात भागपूर उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, भूसंपादन अधिकारी शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, किरण सावंत-पाटील, कार्यकारी अभियंता कडलग आदि उपस्थित होते.

पुनर्वसनासाठी जागांचा सर्व्हे करण्याचे निर्देश

पालकमंत्री पुढे म्हणाले की, भागपूर गावाचे पुनर्वसन करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जवळच्या गावांमध्ये उपलब्ध जागेचा सर्व्हे करण्यात यावा. आसपासच्या ज्या गावात जागा शिल्लक असेल, तेथील ग्रामसभेचा ठराव घेणे, तो जिल्हा परिषदेस सादर करणे आदि कामे संबंधित विभागाने वेळेत करण्याची कार्यवाही करावी. शिवाय जागेची किंमत ठरविण्याचे काम कृषी व वन विभागाने करुन जागेचे भूसंपादनाचे काम भूसंपादन विभागाने करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. ग्रामसभेचा ठराव मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेकडील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले. तर आवश्यक ती कार्यवाही झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

12 हेक्टर जागा अपेक्षित

भागपूर गावात सध्या 84 नोंदणीकृत घरे तसेच 49 अतिक्रमीत झोपड्या असून लोकसंख्या 370 इतकी आहे. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी अंदाजे 12 हेक्टर जागा अपेक्षित असल्याचे भूसंपादन अधिकारी शुभांगी भारदे यांनी सांगितले. तर प्रकल्पा विषयीची माहिती व येत असलेल्या अडचणीची माहिती कार्यकारी अभियंता कडलग यांनी दिली. यावर तातडीने तोडगा काढून आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधित विभागांनी करावी, असे निर्देश शेवटी पालकमंत्री यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.