ETV Bharat / state

सुवर्ण बाजाराला अधिकमास पावला : जळगावात सोने आठशे तर चांदी साडेतीन हजारांनी वधारली! - जळगाव कोरोना अपडेट बातमी

अधिक मासामुळे राज्यात सोन्या-चांदीला चांगलीच मागणी वाढली आहे. यात सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी खरेदीला अधिकच प्रतिसाद मिळत आहे. माहेरी आलेल्या लेकी व जावयासाठी चांदीच्या वस्तूंसह सोन्याचीही खरेदी होत असल्याने मागणी चांगलीच वाढल्याचे सुखद चित्र आहे. अधिक मासाला आपल्याकडेच महत्त्व असले तरी जागतिक पातळीवरही थांबलेला सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने मागणी वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.

gold rose by eight hundred and silver by three and a half thousand in jalgaon
सुवर्ण बाजाराला अधिकमास पावला
author img

By

Published : Oct 12, 2020, 8:52 PM IST

Updated : Oct 12, 2020, 9:55 PM IST

जळगाव - कोरोनामुळे विपरीत परिणाम झालेली सुवर्ण बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यातच अधिकमास असल्याने सोन्या-चांदीला मागणी वाढून त्यांचे भावही वाढले आहेत. सोमवारी जळगावातील सुवर्ण बाजारात चांदीच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात ८०० रुपयांनी वाढ होवून ते ५१ हजार ६०० रुपये झाले.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्यापासून सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे बाजारपेठा बंद असल्याने सुवर्ण बाजारावरही मोठा परिणाम झाला. जागतिक पातळीवर उलाढाल थांबून व सट्टेबाजारात गुंतवणूक वाढू लागल्याने सुवर्ण बाजार अस्थिर झाला. आता हळूहळू अनलॉक होत असताना ग्राहकही वाढू लागले आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने बाजारपेठेतही खरेदी वाढू लागली आहे. गेल्या महिन्यात सातत्याने कमी होत गेलेल्या सोन्या-चांदीला आता मागणी वाढू लागल्याने त्यांच्या भावात वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चांदीचे भाव वाढत आहेत. यामध्ये २९ सप्टेंबरला चांदीच्या भावात एक हजार ८०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर ३० रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून थोडाफार चढ-उतार होऊन सोमवारी (१२ ऑक्टोबर रोजी) चांदीच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती थेट ६४ हजार ५०० रुपये प्रतिकिलो वर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात सोमवारी ८०० रुपयांनी वाढ झाली. सोने ५१ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

सध्या अधिक मासामुळे राज्यात सोन्या-चांदीला चांगलीच मागणी वाढली आहे. यात सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी खरेदीला अधिकच प्रतिसाद मिळत आहे. माहेरी आलेल्या लेकी व जावयासाठी चांदीच्या वस्तूंसह सोन्याचीही खरेदी होत असल्याने मागणी चांगलीच वाढल्याचे सुखद चित्र आहे. अधिक मासाला आपल्याकडेच महत्त्व असले तरी जागतिक पातळीवरही थांबलेला सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने मागणी वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.

Last Updated : Oct 12, 2020, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.