ETV Bharat / state

Gold Rate : सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा दर - गोल्ड दर

जळगावमध्ये सोन्याचे दर आता 47 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर, चांदीचे दर सध्या 68 हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. यापूर्वी कोरोना काळात जवळपास 58 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर पोहोचले होते. तर, चांदी 78 हजार रुपयांपर्यंत गेले होते.

jalgaon
jalgaon
author img

By

Published : Jun 25, 2021, 6:19 PM IST

जळगाव - साधारणपणे कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता 47 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली. त्यानंतर सातत्याने सोन्याचे दर 100 ते 200 रुपयांनी कमी-अधिक राहिले. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी (25 जून) 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्याला जीएसटीशिवाय 47 हजार रुपये, तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 400 रुपये प्रतितोळा असे नोंदवण्यात आले.

स्वरूपकुमार लुंकड, जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव

सोन्याचे दर घसरण्यामागची कारणे -

सोन्याच्या दरांबाबत बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड म्हणाले, की 'सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. दुसरीकडे, अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिच स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात कायम आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे, सोन्याची मागणी घटली आहे. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत'.

जून महिन्यापासून दरात घसरण -

लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक-कमी झाले. आता सोने 47 हजार रुपयांच्या जवळपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. हे दर प्रत्येक दिवसाला 100 ते 200 रुपयांनी कमी-अधिक होत असल्याचे चित्र सराफ बाजारात आहे.

चांदीचीही चकाकी लोपली -

'एकीकडे सोन्याचे दर सातत्याने घसरत असताना दुसरीकडे चांदीचेही दर मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. कोरोना काळात चांदीचे दर प्रतिकिलोसाठी 78 हजार रुपये इतके झाले होते. हे दर आतापर्यंतचे उच्चांकी दर होते. मात्र, चांदीची ही चकाकी आता कमी झाली आहे. चांदीचे दर सध्या 68 हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. जळगाव सराफ बाजारातील स्थितीचा विचार केला तर गेल्या 2 आठवड्यांमध्ये चांदीचे दर प्रतिकिलो मागे 3 हजार रुपयांनी घसरले आहेत', असेही स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.

हेही वाचा - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल करणाऱ्याची जामीनावर सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.