ETV Bharat / state

कोरोना अन् हॉलमार्किंगमुळे 'सुवर्णनगरी' जळगावच्या सराफ बाजारावर मंदीचे सावट

author img

By

Published : Jul 7, 2021, 1:13 AM IST

Updated : Jul 7, 2021, 6:44 AM IST

जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. सचोटीमुळे येथील सराफ बाजारात देशभरातील व्यापारी आणि ग्राहक सोने खरेदीसाठी येत असतात. पूर्वपार ही परंपरा चालत आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात सुवर्णनगरीतील सराफ व्यवसाय धोक्यात आला आहे. कोरोना महामारी आल्यानंतर टाळेबंदी लागली. त्यामुळे सराफ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. तब्बल दीड ते पावणे दोन वर्षांचा काळ हा संक्रमणासारखा म्हणून गेला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना काहीसा दिलासा मिळाला होता.

gold instustry jalgaon crisis due to conana and hallmarking compulsion
कोरोना अन् हॉलमार्किंगमुळे 'सुवर्णनगरी' जळगावच्या सराफ बाजारावर मंदीचे सावट

जळगाव - 'सुवर्णनगरी' म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर पुन्हा एकदा मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सराफ बाजारात कधीकाळी दिवसाला कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असे. मात्र, कोरोना महामारी आली. त्यानंतर संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरू लागला आणि सराफ बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे सक्तीचे केले. त्यामुळे बाहेरील व्यापारी तसेच ग्राहक सोने खरेदीसाठी येत नसल्याने सुवर्णनगरीत उलाढाल थांबली आहे. याठिकाणची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आता काही हजारांवर आली आहे. अशा परिस्थितीत सराफ व्यावसायिकांसह सराफ व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. सचोटीमुळे येथील सराफ बाजारात देशभरातील व्यापारी आणि ग्राहक सोने खरेदीसाठी येत असतात. पूर्वपार ही परंपरा चालत आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात सुवर्णनगरीतील सराफ व्यवसाय धोक्यात आला आहे. कोरोना महामारी आल्यानंतर टाळेबंदी लागली. त्यामुळे सराफ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. तब्बल दीड ते पावणे दोन वर्षांचा काळ हा संक्रमणासारखा म्हणून गेला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने कडक निर्बंध घातले. त्यातच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे सक्तीचे केल्याने सराफ व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यात आहेत दीड हजारांवर सराफ व्यावसायिक -

जळगाव जिल्ह्यात लहान-मोठे मिळून सुमारे दीड हजारांवर सराफ व्यावसायिक आहेत. त्यात सर्वाधिक व्यावसायिक हे एकट्या जळगाव शहरात आहेत. कोरोनामुळे सराफ व्यवसायाचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे हे सर्वच व्यावसायिक सध्या अडचणीत आले आहेत. कोरोना काळात टाळेबंदीमुळे सराफ व्यावसायिकांची दुकाने दीर्घकाळ बंद होती. अशा परिस्थितीत लग्नसराई, सणासुदीचे मुहूर्त हुकले. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या ऑर्डर रद्द झाल्याने सराफांना फटका सहन करावा लागला. या परिस्थितीतून बाहेर पडत नाही तोच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक अजून अडचणीत आले. सध्या जिल्ह्यातील बहुसंख्य सराफ व्यावसायिकांनी शासनमान्य हॉलमार्किंग सेंटरकडे नोंदणी केलेली नसल्याने व्यवहार थांबले आहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिली तर परिस्थिती आणखी चिंताजनक होईल, अशी भीती सराफ व्यावसायिकांना आहे.

काय म्हणतात सराफ व्यावसायिक?

सराफ व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गौतमचंद लुणिया म्हणाले की, सोन्या व चांदीच्या व्यापारासाठी जळगाव जिल्हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, ही ओळख आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण कोरोना, टाळेबंदी आणि त्यानंतर केंद्र सरकारने आणलेली हॉलमार्किंग सक्ती या बाबींमुळे सराफ व्यवसायाला फार मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे टाळेबंदी असताना सराफ बाजार अनेक महिने बंद होता. त्याकाळात एक रुपयांचीही उलाढाल झाली नव्हती. पण सराफांना दैनंदिन खर्च, मजूर व कारागिरांची देणी, कर असे खर्च चुकले नाही. अनलॉकनंतर व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता केंद्र सरकारने 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ॲक्ट- 2016' अंतर्गत 'हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्टस् ऑर्डर- 2020' लागू करून सोन्याच्या दागिन्यांसह इतर सर्व वस्तूंवर हॉलमार्किंग करणे आणि ज्वेलर्सनी हॉलमार्किंग सेंटरमध्ये स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. काही अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हॉलमार्किंगसाठी 1 सप्टेंबर 2021पर्यंत काही शिथिलता प्रदान केली आहे. मात्र, सराफ व्यावसायिकांची यातून सुटका नाहीच. अशा जाचक नियमावलीमुळे सराफ व्यवसाय धोक्यात येण्याची भीती असल्याचे लुणिया यांनी सांगितले.

हेही वाचा - मराठमोळी तरुणी अमेरिकेत झाली अब्जाधिश... कॉन्फ्लुएंट कंपनीतून उभे केले 828 दशलक्ष डॉलर

कोट्यवधी रुपयांचे गुंतून पडले आहे भांडवल -

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले आहे. याला 1 सप्टेंबरपर्यंत शिथिलता असली तरी स्थानिक ग्राहक आणि बाहेरील व्यापारी सोने खरेदीसाठी उत्सुक नाहीत. अनेक सराफांकडे सोन्याचे जुने दागिने घडवून तयार आहेत. पण ते विक्री होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे भांडवल गुंतून पडले आहे. दुसरीकडे, शासनमान्य हॉलमार्किंग सेंटरची कमतरता असल्याने सराफांची हॉलमार्किंगसाठी नोंदणी रखडली आहे. त्यामुळे नव्याने दागिन्यांची घडणावळ करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत दागिने घडवणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. आता ग्राहकच नसल्याने सराफ बाजारात पोत गुंफणारे, किरकोळ दागिने विक्री करणारे व्यावसायिकही हवालदिल झाले आहे. एकूणच सराफ बाजारातील अर्थकारण कोलमडून पडले आहे, असेही गौतमचंद लुणिया म्हणाले.

70 टक्के सुवर्ण कारागीर परतले गावी -

जळगाव जिल्ह्यात सुमारे 12 ते 13 हजार बंगाली सुवर्ण कारागीर दागिने घडवण्याचे काम करून पोट भरत होते. मात्र, कोरोना त्यानंतर हॉलमार्किंग सक्ती अशा कारणांमुळे सराफ व्यवसाय अडचणीत आला. हाताला काम नसल्याने यातील 70 टक्के कारागिरांनी गावी परतणे योग्य समजले. सध्या 25 ते 30 टक्के म्हणजेच अडीच ते तीन हजार कारागीर जळगावात उरले असून, त्यांच्याही हाताला पाहिजे तसे काम नाही. काही दिवस हीच स्थिती राहिली तर जळगावातील सराफ व्यवसायाला घरघर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारने अर्थकारणाचा विचार करावा -

जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सराफ व्यवसायाच्या अर्थकारणाचा विचार करायला हवा. सराफ व्यावसायिकांना सशर्त पूर्णवेळ व्यवसाय करायला परवानगी देण्याची गरज आहे. सराफ बाजारात ग्राहकांची एकाच वेळी गर्दी होत नाही. शिवाय सराफ व्यावसायिक नियम पाळतात. असे असताना निर्बंधांची सक्ती चुकीची वाटते. सराफ व्यवसायातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. मात्र, व्यवसाय ठप्प असल्याने सरकारला कर स्वरूपात मिळणारा महसुलही बुडत आहे. यामुळे सरकरचेही नुकसान होत आहे. सराफ व्यवसायावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांचाही विचार व्हायला हवा. जळगाव जिल्ह्यात सराफ व्यवसायाचे गणित बिघडले आहे. इतर ठिकाणीही वेगळी परिस्थिती नाही, असेही लुंकड यांनी सांगितले.

हेही वाचा - जळगावच्या आव्हाणे गावात एकाच रात्री 12 घरांमध्ये चोरी; लाखोंचा ऐवज केला लंपास

Last Updated : Jul 7, 2021, 6:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.