जळगाव: आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढू लागल्याने गेल्या 5 दिवसांपासून सोने- चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. 5 दिवसात सोन्याचे भाव एक हजार 100 रुपयांनी वाढून ५४ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीतही 2 हजार 700 रुपयांची वाढ होऊन ती 66 हजार 200 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
लग्नसराईमुळे सोने वधारले: लग्नसराई सुरू झाल्यानंतर सोने- चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यात गेल्या 5 दिवसात तर अधिकच वाढ होत आहे. जागतिक पातळीवर मागणी वाढण्यासह भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर वधारत असल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत आहे. 30 नोव्हेंबर रोजी 53 हजार रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात 1 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी वाढ होऊन ते 53 हजार 300 रुपयांवर पोहचले.
डॉलरचे दर वधारत असल्याने: 2 रोजी पुन्हा 500 रुपयांची तर 3 रोजी 150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 5 रोजी 150 रुपयांची वाढ होऊन 5 दिवसात सोन्यात एकूण एक हजार 100 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोमवार 5 डिसेंबर रोजी सोने 54 हजार 100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. चार दिवसांपासून डॉलरचे दर वधारत असल्याने ही वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. १ डिसेंबर रोजी ८१.१२ रुपये दर असलेला डॉलर ५ रोजी ८१.६७ रुपयांवर पोहोचला आहे.
७०० रुपयांची वाढ: चांदीतही २७०० रुपयांची वाढ झाली आहे. अशाच प्रकारे ३० नोव्हेंबर १ रोजी ६३ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १ डिसेंबर रोजी ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर २ रोजी तर एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. ३ रोजी पुन्हा ५०० रुपयांची ३ तर ५ रोजी २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.