ETV Bharat / state

12 दिवसांत दोन हजारांनी वधारले सोने... चांदीतही भाववाढ सुरूच

आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असतो. यात आता भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने सोने-चांदीचे भाव वधारत आहेत.

author img

By

Published : Jun 23, 2020, 5:34 PM IST

gold-and-silver-rate-increased-today-in-jalgaon
12 दिवसात दोन हजारांनी वधारले सोने.

जळगाव - भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 49 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले. सोन्याला मिळालेला हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव असून, अजून येत्या काही दिवसांत सोने 50 हजार रुपये प्रतितोळ्याचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

12 दिवसात दोन हजारांनी वधारले सोने.

आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असतो. यात आता भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने सोने-चांदीचे भाव वधारत आहेत. त्यात कोरोनामुळे विदेशातून होणारी आवकही कमी असल्याने अधिक परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्याच्या भावात गेल्या 12 दिवसांत सुमारे 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती जळगावातील प्रसिद्ध सुवर्णपेढी बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना यांनी दिली.

गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याचे भाव वाढतच आहेत. 9 जून रोजी 46 हजार 800 रुपयांवर असलेले सोने 11 जूनला 47 हजार 200 तर 15 जून रोजी 47 हजार 800 रुपयांवर पोहोचले. त्यानंतर 17 जून रोजी सोन्याने 48 हजार रुपयांचा टप्पा गाठला. 3 दिवस याच भावावर सोने स्थिर होते. मात्र, भारत-चीन सीमेवर तणाव वाढतच असल्याने त्याचा परिणाम होऊन 20 जून रोजी सोन्याच्या भावात थेट 700 रुपयांनी वाढ होऊन ते 48 हजार 700 रुपयांवर पोहोचले.

मंगळवारी तर सोन्याचे भाव 49 हजार रुपयांवर गेले आहे. सोन्याच्या भावातील आतापर्यंतची ही नवी उच्चांकी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद असताना कमॉडिटी बाजारात सोने 49 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले होते.

चांदीतही भाववाढ सुरूच...

सोन्यासोबतच चांदीच्याही भावात सातत्याने वाढ सुरू आहे. 20 जून रोजी चांदीची भाववाढ झाली होती. एकाच दिवसात चांदी एक हजार रुपयांनी वधारली होती. चांदी 50 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सराफ बाजार सुरू झाला, त्यावेळी चांदी 50 हजारांवर होती. मात्र, नंतर काहीशी घसरण होऊन ती 48 हजार 500 रुपयांवर आली होती. आता पुन्हा चांदी 50 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

...तर सोने 50 हजाराच्या पुढे जाणार

अगोदरच कोरोनामुळे आवक कमी असल्याने सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत आहे. त्यात आता भारत-चीन सीमेवर अनिश्चित परिस्थितीमुळे सोने प्रतितोळा व चांदीही प्रतिकिलो 50 हजारांच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोनाचा परिणाम असताना आता भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे, अशी माहिती जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.