ETV Bharat / state

जळगावमध्ये अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, दोन वर्षांच्या मुलीच्या हत्येचा होता आरोप

एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. ही मुलगी आपल्या आजीसोबत रहात होती. या मुलीवर एका दोन वर्षांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारल्याचा आरोप होता.

Jalgaon crime news
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Oct 27, 2020, 8:40 PM IST

जळगाव - शहरातील खोटेनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही मुलगी आपल्या आजीसोबत रहात होती. आत्महत्येपूर्वी या मुलीने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये मी स्वत:हून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येबाबत कोणालाही जबाबदार धरू नये असे तिने म्हटले आहे. दरम्यान या मुलीवर दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप होता.

आत्महत्या केलेली मुलगी सहा महिन्यांपासून खोटेनगरात आजीकडे राहत होती. दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी ती घरातील वरच्या मजल्यावर एका खोलीत झोपली होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत ती खाली न आल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता आतून दरवाजा बंद होता. आवाज देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अल्पवयीन मुलगी ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन वर्षांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारल्याचा आरोप

आत्महत्या केलेली मुलगी आणि तिचे कुटुंब यापूर्वी पिंप्राळा हडको परिसरात राहत होते. तेथे शेजारी राहणाऱ्या दोन वर्षीय बालिकेस पाण्यात बुडवून तिची हत्या केल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तिचे नाव होते. तिच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हडको परिसरातून घर सोडले. ते सध्या राज मालती नगरात राहत होते. दरम्यान, तिची मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.