ETV Bharat / state

मुख्यमंत्रीपदाबाबत रामदास कदमांचे वक्तव्य निरर्थक -  गिरीश महाजन - विधानसभा निवडणूक

येत्या २ दिवसात युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गिरीश महाजन
author img

By

Published : Sep 5, 2019, 5:13 PM IST

Updated : Sep 5, 2019, 5:37 PM IST

जळगाव - युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या २ दिवसात जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक असल्याचेही महाजन म्हणाले.

गिरीष महाजन युतीवर बोलताना

महाजन पुढे म्हणाले, युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच हे सूत्र ठरणार आहे. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची काल चर्चा झाली. या चर्चेला शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः उपस्थित होतो. ही चर्चा सकारात्मक राहिली. येत्या २ दिवसात युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा यावेळी महाजन यांनी केला.

रामदास कदमांचे वक्तव्य निरर्थक -

युतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या काळातच ठरला आहे, असे वक्तव्य करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी कदम यांचे वक्तव्य निरर्थक असल्याचे म्हटले आहे. युतीत मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप काय निर्णय झालाय, याची आपल्याला माहिती नाही. पण याबाबतचा निर्णय देखील अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे सांगत महाजन यांनी कदम यांचा दावा खोडून काढला.

मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येण्यास उत्सुक आहेत. पण आम्हालाही काही मर्यादा आहेत. आमच्याकडेही निष्ठावंत नेते व कार्यकर्ते आहेत. त्यांना डावलून चालणार नाही. शिवाय दुसऱ्या पक्षातील नेत्याला आपल्याकडे घेतले तरच आपले उमेदवार निवडून येतील, अशी परिस्थिती आता भाजपची राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही मेगा भरतीबाबत काही बंधने घालून घेतली आहेत. पण भाजपत येण्यासाठी वेटींग लिस्टवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत. मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर होणार आहे, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. दोघांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. कारण ते त्यांच्या संपर्कात आहेत, असे महाजन यांनी सांगितले.

Intro:जळगाव
युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या २ दिवसात जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात दिली.Body:महाजन पुढे म्हणाले, युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच हे सूत्र ठरणार आहे. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची काल चर्चा झाली. या चर्चेला शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः उपस्थित होतो. ही चर्चा सकारात्मक राहिली. येत्या २ दिवसात युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा यावेळी महाजन यांनी केला.

रामदास कदमांचे वक्तव्य निरर्थक-

युतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या काळातच ठरला आहे, असे वक्तव्य करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी कदम यांचे वक्तव्य निरर्थक असल्याचे म्हटले आहे. युतीत मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप काय निर्णय झालाय, याची आपल्याला माहिती नाही. पण याबाबतचा निर्णय देखील अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे सांगत महाजन यांनी कदम यांचा दावा खोडून काढला.Conclusion:मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर-

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येण्यास उत्सुक आहेत. पण आम्हालाही काही मर्यादा आहेत. आमच्याकडेही निष्ठावंत नेते व कार्यकर्ते आहेत. त्यांना डावलून चालणार नाही. शिवाय दुसऱ्या पक्षातील नेत्याला आपल्याकडे घेतले तरच आपले उमेदवार निवडून येतील, अशी परिस्थिती आता भाजपची राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही मेगा भरतीबाबत काही बंधने घालून घेतली आहेत. पण भाजपत येण्यासाठी वेटींग लिस्टवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत. मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर होणार आहे, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. दोघांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. कारण ते त्यांच्या संपर्कात आहेत, असे महाजन यांनी सांगितले.
Last Updated : Sep 5, 2019, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.