ETV Bharat / state

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 4 फूट, तर घरी 2 फुटांची गणेशमूर्ती बसवावी : जळगाव जिल्हाधिकारी

author img

By

Published : Aug 14, 2020, 6:10 PM IST

जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Jalgaon Collector Abhijit Raut
Jalgaon Collector Abhijit Raut

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामात प्रशासनास सहकार्य करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी 4 फुटांची तर घरगुती म्हणून 2 फूट उंचीची मूर्ती बसवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव 2020 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते.

सदर बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांचेसह शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. तर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचेसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस निरीक्षक ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत…

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमात रक्तदान, प्लाझ्मा दान, विषयक जनजागृती, रुग्णांना मोफत सकस आहार पुरवणे, घरपोच आरोग्य तपासणी करण्यास प्रशासनास मदत व सहकार्य करावे. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. पूजा व आरती करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सार्वजनिक मंडळाकरीता मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, वेबसाईट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करुन द्यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनसाठी सार्वजनिक मंडळांना मदतीचे आवाहन…

कोरोनाबाधित रुगणांच्या रक्तामधील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यामुळे त्यांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. ग्रामपंचायत स्तरावर किवा प्राथमिक आरोग्य केंदस्तरावर ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांकरिता तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपयोगी ठरते. जिल्ह्यातील प्रत्येक गावस्तरावर हे मशीन असावे याकरीता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळांना केले आहे.

कारखानदारांनी मुर्ती बनवताना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे : डॉ. उगले

शासनाच्या मार्गदशक सुचनांनुसार सार्वजनिक मंडळाकरीता मुर्तीची उंची 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांची मर्यादा दिलेली असल्याने गणेशमुर्ती बनविणाऱ्या कारखानादारांनी शासनाच्या या सुचनेचे पालन करावे. तसेच गणेशमंडळाना आवश्यक त्या परवानग्यांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. मंडळांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी यावेळी केले.

एक गाव, एक गणपती संकल्पना राबवावी : डॉ. पाटील

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक गाव, एक गणपती ही संकल्‍पना राबवावी. त्याचबरोबर पुजा व आरतीवेळी शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळल्या जातील याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.

गणेश मंडळाना परवानगी आवश्यक : आयुक्त कुलकर्णी

शासनाच्या नियमांनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्याचबरोबर मंडपाची उभारणी करताना रस्ता, फुटपाथ अथवा कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी. त्यानुसार मंडळांनी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी जी. एस. ग्राउंड व सागर पार्क या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी बैठकीत दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.