ETV Bharat / state

जळगावात कोरोना बाधितांचा आकडा 180 वर; भुसावळात पुन्हा 3 रुग्णांची भर

जिल्हा प्रशासनाला सोमवारी रात्री उशिरा दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 12 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 8 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर, 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती जळगावची तर तीन व्यक्ती भुसावळच्या आहेत.

जळगावात कोरोना बाधितांचा आकडा 180 वर
जळगावात कोरोना बाधितांचा आकडा 180 वर
author img

By

Published : May 12, 2020, 10:35 AM IST

Updated : May 12, 2020, 11:29 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यात पुन्हा 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी जळगावात एक आणि भुसावळमध्ये ३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 180 वर पोहचली आहे.

जिल्हा प्रशासनाला सोमवारी 2 टप्प्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी रात्री उशिरा दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 12 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 8 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर, 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती जळगावची तर तीन व्यक्ती भुसावळच्या आहेत. यामध्ये जळगाव येथील 50 वर्षीय पुरुष, तर भुसावळ येथील तलाठी कॉलनीतील 10 वर्षीय मुलगा, जाम मोहल्ला येथील 48 वर्षीय पुरुष व अयाश कॉलनी येथील 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

मृतांचा आकडाही 25 वर -

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 180 इतकी झाली असून, त्यापैकी 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Last Updated : May 12, 2020, 11:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.