जळगांव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे माजी आमदार आबाजी नाना पाटील यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी रात्री तालुक्यातील शहापूर या त्यांच्या मूळगावी निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.
पाटील शिक्षण संस्थेचे सलग ४० वर्षे अध्यक्ष -
आबाजी पाटील हे १९६२ ते १९६७ व १९६७ ते १९७१ असे सलग १० वर्षे त्यांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. जिल्हा लोकल बोर्डाचे ते सदस्य होते. स्वातंत्र्य सैनिक दिवंगत राजमल लखीचंद ललवाणी यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले. ललवाणी यांनी स्थापन केलेल्या जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे ते सलग ४० वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीत जामनेरला वीज पुरवठ्यास सुरुवात झाली. सहकारी तत्वावरील पहिल्या रम प्रकल्पाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिक्षण महर्षी असलेले पाटील हे अण्णासाहेब या नावाने ओळखले जात.
हेही वाचा - जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आसिफ खान यांचा अपघाती मृत्यू
पार्थिवावर आज (बुधवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार -
आबाजी पाटील हे आपल्या मितभाषी स्वभावाने संपूर्ण जिल्ह्याला परिचित होते. त्यांच्या निधनामुळे जामनेर शहरासह जिल्हाभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.