ETV Bharat / state

Jalgaon Flood : जळगावात पुन्हा उद्भवली पूरस्थिती; रात्रभर सर्वदूर मुसळधार पाऊस - flood situation in jalgaon

जळगावात आज, मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरूच आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जामनेर तालुक्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.

jalgoan flood
जळगावात पूरस्थिती
author img

By

Published : Sep 28, 2021, 5:08 PM IST

जळगाव - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात सोमवारी (27 सप्टेंबर) सायंकाळनंतर सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर धो-धो बरसल्यानंतर आज, मंगळवारी देखील सकाळपासून पाऊस सुरूच आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जामनेर तालुक्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलासह कन्नड घाट परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे तितूर व डोंगरी नदीला पूर आला आहे. दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील गळद नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. जामनेर तालुक्यात खडकी नदीवरील तोंडापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.

  • चाळीसगावात महिनाभरात चौथ्यांदा पूर-

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलासह कन्नड घाट परिसरात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्‍हा एकदा पूरस्थिती उद्भवली आहे. महिनाभरातच चौथ्‍यांदा चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांना पुरावा वेढा पडला आहे. डोंगरी व तितूर नदीला पूर आल्याने चाळीसगाव शहरातील घाट रोड, बामोशी बाबा दर्गा परिसर पाण्याखाली गेला आहे. सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तितूर नदीकाठच्या वस्तीत घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामठी, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी गावांना पुराचा वेढा पडला आहे.

  • तितूर नदी पुन्हा कोपली-

तितूर नदीला सप्टेंबर महिन्यात चौथा पूर आला आहे. पुरामुळे कजगाव, नागद गावांना वेढा पडला आहे. या परिसरातील बांबरूड, गोंडगाव, कनाशी, पिंप्री या भागातील नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. कनाशी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोंडगाव रस्त्यावरील ब्रिटीशकालीन नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. पुराच्या पाण्यामुळे कजगाव-नागद रस्ता बंद झाला असून, या रस्त्यावरून जाणारी वाहतूक ठप्प होऊन परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा - Jalyukt Shivar : तत्कालीन फडणवीस सरकारच्या 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू

  • जामनेर तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपले-

सोमवारी सायंकाळी जामनेर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. मुसळधार पावसामुळे खडकी नदीला पूर आला असून, तोंडापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तोंडापूर गावाला पाण्याचा वेढा पडला. गावातील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. तोंडापूरजवळ असलेला रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने फत्तेपूरहून फर्दापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

  • वाघूर धरणाचे 20 दरवाजे उघडले-

अतिवृष्टीमुळे वाघूर नदीलाही पूर आला असून, वाघूर धरणाचे यावर्षी पहिल्यांदा 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या 49 हजार 618 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • सिंचन प्रकल्प तुडुंब-

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पही भरला असून, या प्रकल्पातून आज सकाळी 9 दरवाजे 0.15 मीटरने उघडून 4 हजार 59 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. रावेर तालुक्यातील मोर मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 3 सें.मी.ने उघडण्यात आले आहेत. जामदा बंधारा देखील तुडुंब भरला असून, त्यातून 15 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीतून 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गिरणा प्रकल्पात सध्या 78 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे, मन्याड धरणही फुल्ल झाले असून, या धरण क्षेत्रात 75 मिलिमीटर पाऊस झाला असून, 5 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा - VIDEO : सोयाबीन शेतकरी संकटात; विविध मागण्यांसाठी वाशिममध्ये भर पावसात काढला मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.