ETV Bharat / state

संचारबंदीचे उल्लंघन अन् सोशल डिस्टन्सिंगला देखील हरताळ.. जळगावात पाच व्यापाऱ्यांचे परवाने रद्द - कैलास चाैधरी

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हाेणाऱ्या भाजीपाला लिलावात गर्दी कमी करून साेशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याला व्यापाऱ्यांनी न जुमानता गर्दी करून लिलाव करणे सुरूच ठेवले. अखेर शनिवारी जिल्हाधिकारी व पाेलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष सदर ठिकाणी भेट दिली.

Agricultural Income Market Committee Fruit Vegetable Market Jalgaon
कृषी उत्पन्न बाजार समिती फळे भाजीपाला मार्केट जळगाव
author img

By

Published : Apr 4, 2020, 4:46 PM IST

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हाेणाऱ्या भाजीपाला लिलावात गर्दी कमी करून साेशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याला व्यापाऱ्यांनी न जुमानता गर्दी करून लिलाव करणे सुरूच ठेवले. अखेर शनिवारी जिल्हाधिकारी व पाेलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष सदर ठिकाणी भेट दिली. तेव्हा त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे आणि प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पाच घाऊक व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या व्यापाऱ्यांविरोधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचा परवाना दि. १४ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

संचारबंदीचे उल्लंघन अन् सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांवर कारवाई...

हेही वाचा... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंसिंग’चा अभिनव उपक्रम

कृषी उत्पन्न बाजार समितीला काेराेना विषाणूचा संसर्गजन्य राेगाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी धान्य खरेदी-विक्री व भाजीपाला खरेदी, विक्री करण्यासाठी एकाच वेळी १० पेक्षा अधिक नसतील एवढ्या लाेकांना प्रवेश देण्याबाबत कळवण्यात आले आहे. टप्प्याटप्याने व्यवहार सुरू ठेवण्याबाबत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने याेग्य ती कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे व पाेलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांनी बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये पाहणी केली. त्यांना काही व्यक्ती किरकाेळ भाजीपाला खरेदी करून घेऊन जाताना दिसले. त्यांना दाेघांनी भाजीपाला काेठून खरेदी केला, याबाबत विचारणा केली. त्यांनी भाजीपाला मार्केटमधून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी व पाेलीस अधीक्षकांनी सभापती कैलास चाैधरी यांना बाेलावून किरकाेळ भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा... जळगावमध्ये पोलिसांच्या वाहनावर जमावाची तुफान दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

सभापती कैलास चाैधरी, सचिन माळी, कैलास शिंदे व इतर कर्मचाऱ्यांना पाच घाऊक व्यापारी नागरिकांना किरकाेळ भाजीपाला विक्री करताना आढळून आले. त्यांनी या व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यापासून राेखले व त्यांची दुकाने बंद केली. या प्रकरणात बाजार समितीचे फळे व भाजीपाला विक्री विभागाचे प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पाेलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाजार समितीत जाऊन गर्दी पांगवली.

बाजार समितीतील या व्यापाऱ्यांवर केली कारवाई

गजानन ट्रेडिंग कंपनीचे प्राेप्रायटर आसाराम दामू बाविस्कर (दुकान क्रमांक १९), नाना पाटील अंड सन्स कंपनीचे प्राे.प्रा. चंद्रकांत अशाेक पाटील (दुकान क्रमांक ६१), जाेशी ब्रदर्सचे प्राे.प्रा. सदाशिव वेडू जाेशी (दुकान क्रमांक ५२), प्राे.प्रा. हाजी रफीक इसा बागवान (दुकान क्रमांक ४३) या व्यापाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दि. 14 एप्रिल पर्यंत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.