ETV Bharat / state

बोरखेडा हत्याकांड प्रकरणातील पहिला आरोपी गजाआड - जळगाव क्राईम न्यूज

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील अत्याचार व हत्यांकाड प्रकरणीएका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू असून येत्या 60 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाई, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

file photo
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 22, 2020, 8:14 PM IST

जळगाव - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सात दिवसानंतर पहिल्या संशयित आरोपीस अटक केली आहे. महेंद्र सीताराम बारेला (वय 19 वर्षे, रा. केऱ्हाळा, ता रावेर), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. येणाऱ्या 60 दिवसांच्या आत न्यायालयात दोषाराेपपत्र सादर केले जाईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले.

बोरखेडा रस्त्यावर एका शेतातील खोलीत एक 13 वर्षीय मुलीसह तीन बालकांची हत्या झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेची चर्चा राज्यभर सुरू झाली. गेल्या सात दिवसांपासून पोलीस यंत्रणा तपासात लागलेली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तीन अल्पवयीन मुलांची संशयित म्हणून नावे घेतल्यामुळे त्या दिवसापासून या तिघांची चौकशी सुरू आहे. तर गुरुवारी (दि. 22 ऑक्टोबर) पोलिसांनी 19 वर्षीय तरुणास अटक केली. हा तरुण पहिल्या दिवसापासून बेपत्ता होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले. वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांच्या सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दोन्ही प्रकारात संशयिताचा सहभाग

अटकेत असलेला संशयित महेंद्र बारेला हा हत्या व अत्याचार अशा दोन्ही गुन्ह्यात सहभागी आहे. याबाबतचे तांत्रिक पुरावे पोलिसांना प्राप्त झालेेले आहेत. संशयित आरोपीला अटक करण्यासाठी सर्व बाजुंनी पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तथ्य जुळल्यानंतरच संशयितास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपासात बाधा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या प्रकरणात इतर कोणत्याही बाबींवर सविस्तर बोलणे टाळले आहे. या गुन्ह्याचा तपास अद्याप संपलेला नाही. एवढेच पोलीस वारंवार सांगत आहेत.

हेही वाचा - फडणवीस..! तुम्ही तेव्हाच का माझ्याविषयी भूमिका स्पष्ट केली नाही; खडसेंचा थेट सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.