ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात 52 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 1,578 वर

author img

By

Published : Jun 12, 2020, 8:13 PM IST

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये, जळगाव शहर 17, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 2, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, रावेर 1 तसेच पारोळा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 हजार 578 इतकी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात 52 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात 52 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यातील सर्वाधिक 20 रुग्ण भुसावळ शहरात आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव शहरातही 17 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा हा 1 हजार 578 वर पोहोचला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण वाढत चालला आहे. जळगाव शहरासह भुसावळमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. भुसावळात कोरोनाग्रस्त रुग्णांचे त्रिशतक पूर्ण झाले असून जळगाव शहरही त्रिशतकाच्या उंबरठ्यावर आहे. सद्यस्थितीत जळगावात कोरोनाचे 297 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 17, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 2, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, रावेर 1 तसेच पारोळा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.

पाचोरा, भडगाव, धरणगाव, चाळीसगाव मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात सुदैवाने शुक्रवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर, चोपडा आणि रावेरात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजना तसेच जिल्हा प्रशासनाने प्रयत्न कोरोनाच्या नियंत्रणात अपुरे पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना अपडेट्स -

जळगाव शहर - 297
जळगाव ग्रामीण - 44
भुसावळ - 300
अमळनेर - 217
चोपडा - 101
पाचोरा - 41
भडगाव - 89
धरणगाव - 74
यावल - 71
एरंडोल - 41
जामनेर - 80
रावेर - 110
पारोळा - 69
चाळीसगाव - 17
मुक्ताईनगर - 11
बोदवड - 12
इतर जिल्ह्यातील - 4
एकूण - 1578

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.