ETV Bharat / state

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून राणे कुटुंबीयांचे सांत्वन - jalgaon breaking news

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू झाला होता. तर उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी झाले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी (दि. 8 जून) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी फोनवरून राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. धामोरे यांचीही त्यांनी विचारपूस केली.

डॉ. नितीन राऊत
डॉ. नितीन राऊत
author img

By

Published : Jun 8, 2021, 8:04 PM IST

Updated : Jun 8, 2021, 8:45 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू झाला होता. तर उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी झाले होते. 7 जूनला दुपारी 1 वाजेनंतर ही घटना घडली होती. या घटनेची राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दखल घेतली आहे. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंत्री राऊत यांनी फोनवरून राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. धामोरे यांचीही त्यांनी विचारपूस केली.

बोलताना डॉ. राऊत

कृषी पंपांच्या वीज बिलांची महावितरण कंपनीकडून सक्तीने वसुली होत असल्याने सोमवारी (दि. 7 जून) शिवसेनेकडून भडगाव व पाचोरा तालुक्यात महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सर्वत्र हे आंदोलन शांततेत पार पडले. परंतु, भडगाव येथे चाळीसगाव रस्त्यावरील कार्यालयात दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 जण आले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना मारहाण करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी हल्लेखोरांच्या तावडीतून धामोरे यांना सोडवण्यासाठी गेलेले गजानन राणे यांनाही मारहाण झाली. त्यात ते जमिनीवर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

दोषींवर कठोर कारवाईचे दिले आश्वासन

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी फोनवरून राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिवंगत गजानन राणे यांचा मुलगा शुभम याच्याशी त्यांनी संवाद साधत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. लवकरच महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांना जळगावमध्ये पाठवले जाईल. पीडित कुटुंबातील सदस्य आणि सर्व संबंधितांशी बोलून ते आपला अहवाल सादर करतील. हा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करून या प्रकरणी सखोल तपासासाठी विनंती केली जाईल. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

हेही वाचा - जमावाच्या धक्काबुक्कीत जमिनीवर पडून वायरमनचा मृत्यू; भडगावच्या महावितरण कार्यालयातील घटना

Last Updated : Jun 8, 2021, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.