जळगाव- बसच्या चाकाखाली आल्याने एका 70 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात घडली. देवकाबाई नारायण सपकाळे (वय 70, रा. कानळदा, ता. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव; बसच्या चाकाखाली आल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू - elderly-woman- death-in bus accident in jalgaon
बसचालक बस फलाटावर लावण्यासाठी मागे घेत होता. तेव्हा बसच्या मागे वृद्धा असल्याची कल्पना न आल्याने त्याने थेट बस मागे घेतली. याच वेळी देवकाबाई बसच्या चाकाखाली आल्या. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बसच्या चाकाखाली आल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू
जळगाव- बसच्या चाकाखाली आल्याने एका 70 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात घडली. देवकाबाई नारायण सपकाळे (वय 70, रा. कानळदा, ता. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 19, 2021, 5:55 PM IST
TAGGED:
accident in jalgaon