ETV Bharat / state

जळगाव: एकनाथ खडसेंच्या 11 समर्थकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज

महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या उर्वरित नगरसेवकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. प्रभागातील कामेदेखील थांबल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत होती. हीच आयती संधी साधत शिवसेनेने भाजपचे नगरसेवक गळाला लावल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ खडसे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Sep 24, 2021, 10:38 PM IST

मुंबई - जळगावमधील मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील ११ नगरसेवकांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी या नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधले. हा एकनाथ खडसेंना धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी ईडी लावली तर आम्ही शिडी लावू, असा भाजपला इशारा दिला होता. मात्र, जळगावच्या ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे सगळे नगरसेवक खडसे समर्थक असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा-UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण

भाजपच्या 3 नगरसेवकांनी 30 मे 2021 रोजी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले. त्यानंतर भाजपचे अजून काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती.

हेही वाचा-मुंबई बँक भ्रष्टाचाराबद्दल किरीट सोमैय्या गप्प का? राजू शेट्टी यांचा सवाल

भाजपमध्ये खदखद-

महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या उर्वरित नगरसेवकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. प्रभागातील कामेदेखील थांबल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत होती. हीच आयती संधी साधत शिवसेनेने भाजपचे नगरसेवक गळाला लावल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

भाजपचे आणखी 5 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील. आम्ही कुणाला बळजबरी करत नाही. पालकमंत्री पदाचा बडेजावपणाही दाखवत नाही', अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत दिली होती.

हेही वाचा-नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय धार्मिकस्थळं होणार खुली; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

दडपणाला बळी पडणार नाही- एकनाथ खडसेंनी वाढदिवसाला विरोधकांवर साधला होता निशाणा-

'माझ्या हितचिंतकांनीच मी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा जनमाणसात उभी केली. असे असले तरी मी त्यांना आज शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे, मी कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवशी 2 सप्टेंबरला विरोधकांवर निशाणा साधला होता. पुढे खडसे म्हणाले होते की, सर्वसामान्य मतदार हा विकास पाहून मतदान करतो. मुक्ताईनगर मतदारसंघात मी गेल्या 40 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. हे करत असताना केवळ मुक्ताईनगर नव्हे, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज मी कोणत्याही पदावर नसलो तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे खडसे यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.