ETV Bharat / state

'कर नाही त्याला डर कशाला'; ईडीच्या चौकशीवर एकनाथ खडसेंनी सोडले मौन

author img

By

Published : Aug 29, 2021, 7:14 PM IST

एकनाथ खडसे हे गेल्या महिनाभरापासून मुंबईत होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मुंबईतून ते आज (रविवारी) पहाटे जळगावात परतले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते ईडी चौकशी बद्दल बोलतांना म्हणाले, कर नाही त्याला डर कशाला...

Eknath Khadse's reaction regarding ED inquiry in Jalgaon
ईडीच्या चौकशीवर एकनाथ खडसेंनी सोडले मौन

जळगाव - 'कर नाही त्याला डर कशाला या माध्यमातून आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहोत. ईडीच्या चौकशीत काय ते सत्य बाहेर येईलच. जर या प्रकरणात काही चूक असेल तर कारवाई होईल. नाही तर न्यायालय आहेच, न्यायालय श्रेष्ठ आहे', अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अखेर ईडीच्या चौकशीवर मौन सोडले आहे.

'कर नाही त्याला डर कशाला'

मुंबईतून महिनाभरानंतर जळगावात परतले खडसे -

एकनाथ खडसे हे गेल्या महिनाभरापासून मुंबईत होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मुंबईतून ते आज (रविवारी) पहाटे जळगावात परतले. त्यांनी मुक्ताईनगरात आपल्या फार्महाऊसवर पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

भोसरीच्या भूखंड खरेदीच्या प्रकरणात ईडीकडून सुरू आहे चौकशी -

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या खरेदीत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ईडीडून चौकशी सुरू आहे. ईडीने खडसेंची या प्रकरणात दोन वेळा कसून चौकशी केली आहे. तर त्यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत असून, पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव वेळ मागून घेतली आहे. दरम्यान, ईडीने नुकतीच खडसेंच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या पार्श्वभूमीवर खडसे ईडीच्या चौकशीबाबत काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर खडसेंनी मौन सोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवरील ईडीच्या कारवाईला समर्थन देत ते म्हणाले होते, 'जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो'. या पाटलांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी ईडीच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे की, त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल, असे मी बोललो होतो. योग्य वेळी सीडी बाहेर येईलच. सीडी मी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्यावर तपास करत आहेत. त्याचा रिपोर्ट आला की मी त्याचा अहवाल सर्वांसमोर जाहीर करेलच, असेही खडसेंनी ठणकावून सांगितले.

हेतुपुरस्सर माझी चौकशी लावली -

खडसे पुढे म्हणाले, गेली ४० वर्ष मी राजकीय जीवनात काम करतोय. या ४० वर्षांत एकही आक्षेप माझ्यावर आलेला नाही. मात्र, भोसरीतील जमिनीच्या खरेदीसंदर्भात माझ्यावर हेतुपुरस्सर आक्षेप घेण्यात आला. या जमिनीच्या व्यवहाराची यापूर्वी संपूर्ण चौकशी झाली आहे. चौकशी होऊन याचा अहवाल पुण्याच्या न्यायालयात देखील मांडला गेलेला आहे. त्यामध्ये कोणताही दोष नाही, असे स्पष्टीकरण एसीबीने दिलेले आहे. तरी त्यावर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, कर नाही त्याला डर कशाला, या माध्यमातून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी वारंवार सरकारला विचारत होतो की माझा काय दोष आहे? मी दोषी असेल तर मला फासावर लटकवा. माझा काय गुन्हा आहे, ते तरी सांगा. याबाबतची माझी भाषणे आजही युट्युबवर आहेतच. ईडी चौकशी करत आहे. त्या संदर्भात चूक असेल कारवाई होईल, अन्यथा न्यायालय आहेच, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी आपल्या आजूबाजूला बघावे -

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आमच्याकडे जे गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणारी माणसे आहेत, त्यांच्यावर आम्ही कठोर कार्यवाही करतो, असे म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आजूबाजूला बसलेल्यांकडे बघावे, अशी माझी अपेक्षा आहे. ते जे बोलले आहेत त्यांनी ते पूर्ण करावे, अशा शब्दांत खडसेंनी पाटलांना टोला लगावला आहे.

हेही वाचा - 100 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचिट ? सीबीआयकडून मोठा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.