ETV Bharat / state

खडसेंना डावलल्याने लेवा समाज आक्रमक; भाजप पक्षश्रेष्ठींचा नोंदवला निषेध

author img

By

Published : Oct 2, 2019, 2:39 PM IST

Updated : Oct 2, 2019, 2:53 PM IST

खडसे प्रतिनिधित्व करत असलेल्या लेवा पाटीदार समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भुसावळमध्ये पत्रकार परिषद घेऊन खडसेंना डावलणाऱ्या भाजप सरकारचा निषेध नोंदवला.

लेवा समाज आक्रमक

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पहिल्या यादीत डावलल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर खडसे समर्थकांचा रोष वाढला आहे. खडसे प्रतिनिधित्व करत असलेल्या लेवा पाटीदार समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भुसावळमध्ये पत्रकार परिषद घेऊन खडसेंना डावलणाऱ्या भाजप सरकारचा निषेध नोंदवला. दुसऱ्या यादीत खडसेंना सन्मानपूर्वक उमेदवारी दिली नाही, तर लेवा पाटीदार समाज भाजपविरोधात योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

खडसेंना डावलल्याने लेवा समाज आक्रमक

हेही वाचा - डान्स बारमध्ये सापडलेल्यांना तुम्ही तिकीट देता; भाजपमध्ये नागपुरातच बंडखोरीची शक्यता

महाराष्ट्रासह देशभरात लेवा पाटीदार समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या समाजाचे प्रमुख निर्णय जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या भोरगाव येथील लेवा पंचायत घेत असते. खडसेंना पहिल्या यादीत उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारी लेवा पंचायतीच्या पंच मंडळाने तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्यासह पंच मंडळाच्या सदस्यांनी यावेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना निर्वाणीचा इशारा दिला.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

भाजप सरकार गेल्या तीन ते चार वर्षांपासून एकनाथ खडसेंवर अन्याय करत आहे. मात्र, तरीही लेवा पाटीदार समाज शांत आहे. खडसेंवर अन्याय होत असताना देखील आम्ही भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. पण, आता भाजपने खडसेंना पुन्हा डावलल्याने आम्ही सरकारचा निषेध नोंदवत आहोत. भाजपने त्यांना दिलेल्या सापत्न वागणुकीमुळे आम्ही नाराज आणि दुःखी झालो आहोत, अशा भावना यावेळी कुटुंबनायक रमेश पाटील यांनी मांडल्या.

उमेदवारी दिली नाही तर निर्णय घेऊ -

भाजपने एकनाथ खडसेंना उद्या दुसऱ्या यादीत सन्मानपूर्वक उमेदवारी दिली नाही तर लेवा पाटीदार समाज भाजप सरकारविरोधात आपला निर्णय जाहीर करेल. यापुढे खडसे जो निर्णय घेतील, त्यालाही समाजबांधवांचा पाठींबा असेल. खडसेंनी पक्ष बदलला तर तरीही समाजबांधव खडसे ज्या पक्षात जातील, त्याला पाठींबा दर्शवतील, असा निर्णय यावेळी लेवा समाजाच्या पंच मंडळाच्या सदस्यांनी जाहीर केला.

हेही वाचा - विविध भाषेतील बॅनरमुळे आदित्य ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल

Intro:जळगाव
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पहिल्या यादीत डावलल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर खडसे समर्थकांचा रोष वाढला आहे. खडसे प्रतिनिधित्व करत असलेल्या लेवा पाटीदार समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भुसावळात पत्रकार परिषद घेऊन खडसेंना डावलणाऱ्या भाजप सरकारचा निषेध नोंदवला. दुसऱ्या यादीत खडसेंना सन्मानपूर्वक उमेदवारी दिली नाही तर लेवा पाटीदार समाज भाजपविरोधात योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.Body:महाराष्ट्रासह देशभरात लेवा पाटीदार समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या समाजाचे प्रमुख निर्णय जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या भोरगाव येथील लेवा पंचायत घेत असते. खडसेंना पहिल्या यादीत उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारी लेवा पंचायतीच्या पंच मंडळाने तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्यासह पंच मंडळाच्या सदस्यांनी यावेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना निर्वाणीचा इशारा दिला. भाजप सरकार गेल्या तीन ते चार वर्षांपासून एकनाथ खडसेंवर अन्याय करत आहे. मात्र, तरीही लेवा पाटीदार समाज शांत आहे. खडसेंवर अन्याय होत असताना देखील आम्ही भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. पण आता भाजपने खडसेंना पुन्हा डावलल्याने आम्ही सरकारचा निषेध नोंदवत आहोत. भाजपने त्यांना दिलेल्या सापत्न वागणुकीमुळे आम्ही नाराज आणि दुःखी झालो आहोत, अशा भावना यावेळी कुटुंबनायक रमेश पाटील यांनी मांडल्या.Conclusion:उमेदवारी दिली नाही तर निर्णय घेऊ-

भाजपने एकनाथ खडसेंना उद्या दुसऱ्या यादीत सन्मानपूर्वक उमेदवारी दिली नाही तर लेवा पाटीदार समाज भाजप सरकारविरोधात आपला निर्णय जाहीर करेल. यापुढे खडसे जो निर्णय घेतील, त्यालाही समाजबांधवांचा पाठींबा असेल. खडसेंनी पक्ष बदलला तर तरीही समाजबांधव खडसे ज्या पक्षात जातील, त्याला पाठींबा दर्शवतील, असा निर्णय यावेळी लेवा समाजाच्या पंच मंडळाच्या सदस्यांनी जाहीर केला.

बाईट : रमेश पाटील, कुटुंबनायक, लेवा समाज
Last Updated : Oct 2, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.