जळगाव- देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आल्याने त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे. मात्र, तुम्ही नाथाभाऊची पिळवणूक केली नाही का, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित ( Eknath Khadse slammed Devendra Fadnavis ) केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले, की मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्याचे माहिती मिळताच माझी पिळवणूक सुरू झाली. माझे मागे नाहक जमीन भूखंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर ( Eknath Khadse Dawood Ibrahim connection ) संबंध जोडले आहे. अंजली दमानिया यांना माझ्यामागे लावण्याचे कारस्थान केल्याचा आरोप एकनाथ खडसे ( Eknath Khadse slammed Anjali Damania ) यांनी केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात माझादेखील फोन टॅप झाल्याचा दावा खडसे ( Phone tapping of Khadse ) यांनी केला आहे. फोन कुणाचे टाईप होतात? अंडरवर्ल्डशी संबंध असल्याने त्याचेच फोन टॅप होतात. त्यामुळे माझा फोन टॅप करण्याचे काय कारण होते? असेदेखील सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा-Phone Tapping Case : न्यायालयांकडून तपास यंत्रणांची कान उघाडणी तरी राजकारण शिगेला
जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी चार जणांना अटक
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी ( Jalyukt Shivar Yojana ) परळीतील चार वर्षांपूर्वी गाजलेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ मार्च रोजी चौघांना अटक केली. कृषी विभागाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह विद्यमान दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाजी शंकरराव हजारे (रा.अंबाजोगाई), विजयकुमार अरुण भताने, पांडुरंग जगन्नाथ जंगमे, अमोल मारोतीराव कराड (तिघे रा.परळी) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचाHijab row verdict : ती याचिका चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आली होती - अंजुम इनामदार