ETV Bharat / state

वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार व्हायला हवा होता; राज्य सरकारच्या निर्णयावर एकनाथ खडसेंची नाराजी - Eknath Khadse news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील लोकांनी आषाढी वारीसाठी दिलेल्या प्रस्तावाचा राज्य सरकारने विचार करायला हवा होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसेंची नाराजी
एकनाथ खडसेंची नाराजी
author img

By

Published : Jun 12, 2021, 9:28 PM IST

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील लोकांनी आषाढी वारीसाठी दिलेल्या प्रस्तावाचा राज्य सरकारने विचार करायला हवा होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार व्हायला हवा होता; राज्य सरकारच्या निर्णयावर एकनाथ खडसेंची नाराजी

वारकरी संप्रदायातील लोकांचा हिरमोड

एकनाथ खडसे हे शनिवारी मुक्ताईनगरात होते. आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी आपले मत मांडले. राज्य सरकारने यावर्षी वारीसाठी पायी जाण्यास रवानगी नाकारली असून, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पादुका एसटी बसनेच पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायातील लोकांचा हिरमोड झाला आहे.

काय म्हणाले खडसे?
मुक्ताईनगर येथील श्रीसंत मुक्ताबाईंची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते. या पालखी सोहळ्याला पूर्वापार चालत आलेली परंपरा लाभली आहे. पायी वारीमध्ये हजारो लोक सामील होत असतात. पण कोरोनामुळे दोन वर्षांपासून पायी वारीच्या परंपरेला छेद मिळाला. राज्य सरकारने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी दिली आहे‌. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसलेला असतो. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे, ही वारकऱ्यांची इच्छा असते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले होते, या प्रस्तावांचा विचार झाला असता तर वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Drama : महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की चाललयं काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.