ETV Bharat / state

पंकजा-रोहिणी यांचा पराभव पक्षांतर्गत कारवायांमुळेच - एकनाथ खडसे

पंकजा मुंडेंसह रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपमधील काही जणांनी केलेल्या पक्षांतर्गत कारवाया कारणीभूत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेच नाही, तर भाजपमधील अनेकजण नाराज आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

eknath khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Dec 2, 2019, 11:52 PM IST

Updated : Dec 3, 2019, 7:09 AM IST

जळगाव - पंकजा मुंडेंसह रोहिणी खडसे यांचा पराभवाला भाजपमधील काही जणांनी केलेल्या पक्षांतर्गत कारवाया कारणीभूत आहेत. त्यांचा पराभव व्हावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडेच नाही, तर भाजपमधील अनेकजण नाराज आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यापासून नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर सातत्याने हल्लाबोल सुरू आहे. सोमवारी जळगावात आपल्या 'मुक्ताई' निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी हा गौप्यस्फोट केला. खडसे पुढे म्हणाले, भाजपमध्ये पंकजा मुंडेंसह अनेकजण नाराज आहेत. पंकजा मुंडे तसेच रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करून हेतूपुरस्सरपणे पाडण्यात आले आहे. ज्यांनी हे कारस्थान केले; त्यांच्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधितांवर कारवाईची मागणी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता असल्याचे खडसेंनी सांगितले.

पराभूत उमेदवारांशी साधी चर्चाही केली नाही

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. परंतु, पराभूत उमेदवारांशी साधी चर्चाही पक्षश्रेष्ठींनी केली नाही. यामुळे अनेकजण नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींनी पराभूत उमेदवारांशी चर्चा करून पराभवाची कारणे शोधायला हवी होती. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंतही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.

...तर गोपीनाथ गडावर जाऊ -
पंकजा मुंडे काय निर्णय घेणार? हे माहिती नाही. त्यामुळे १२ डिसेंबरपर्यंत सर्वांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्याला बोलावले तर आपण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर निश्चित जाऊ, असेही खडसे यांनी शेवटी सांगितले.

हेही वाचा - थोरात, जयंत पाटलांनी केलेला उल्लेख हीच माझ्या कामाची पावती- एकनाथ खडसे

Intro:Please use file photo of khadse

जळगाव
पंकजा मुंडेंसह रोहिणी खडसे यांचा पराभवाला भाजपतील काही जणांनी केलेल्या पक्षांतर्गत कारवाया कारणीभूत आहेत. त्यांचा पराभव व्हावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई झालेली नाही. म्हणून पंकजा मुंडेच नाही तर भाजपतील अनेक जण नाराज आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. Body:नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यापासून नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्याकडून स्वकियांवर सातत्याने हल्लाबोल सुरू आहे. सोमवारी जळगावात आपल्या 'मुक्ताई' निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी हा गौप्यस्फोट केला. खडसे पुढे म्हणाले, भाजपत पंकजा मुंडेंसह अनेक जण नाराज आहेत. पंकजा मुंडे तसेच रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करून हेतूपुरस्सरपणे पाडण्यात आले आहे. ज्यांनी हे कारस्थान केले; त्यांच्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधितांवर कारवाईची मागणी करुनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता असल्याचे खडसेंनी सांगितले.

पराभूत उमेदवारांशी साधी चर्चाही केली नाही-

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासह अनेक दिगग्ज नेत्यांचा पराभव झाला. परंतु, पराभूत उमेदवारांशी साधी चर्चाही पक्षश्रेष्ठींनी केली नाही. यामुळे अनेक जण नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींनी पराभूत उमेदवारांशी चर्चा करून पराभवाची कारणे शोधायला हवी होती. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंतही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.Conclusion:... तर गोपीनाथ गडावर जाऊ-

पंकजा मुंडे काय निर्णय घेणार? हे माहिती नाही. त्यामुळे १२ डिसेंबरपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्याला बोलावले तर आपण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर निश्चित जाऊ, असेही खडसे यांनी शेवटी सांगितले.
Last Updated : Dec 3, 2019, 7:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.