ETV Bharat / state

नाथाभाऊ म्हणाले, 'आता इंग्लिशमधून पण सांगू का?'

author img

By

Published : Dec 26, 2020, 8:35 PM IST

ईडीने मला नोटीस बजावली आहे. ही नोटीस मला शनिवारी मिळाली. मला 30 डिसेंबरला मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

नाथाभाऊ म्हणाले...
नाथाभाऊ म्हणाले...

जळगाव - ईडीने मला नोटीस बजावली आहे. ही नोटीस मला शनिवारी मिळाली. मला 30 डिसेंबरला मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ही सर्व माहिती दिल्यानंतर हीच माहिती हिंदीमध्ये सांगण्याची विनंती तेथील पत्रकारांनी केली. खडसे यांनी हिंदीमध्ये ही सर्व माहिती दिली. त्यानंतरही पत्रकार खडसेंना प्रश्न विचारतच होते. यावेळी खडसे म्हणाले 'आता इंग्लिशमधून पण हीच सगळी माहिती कोणाला हवी का?' असा प्रश्न त्यांनी विचारला आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

नाथाभाऊ म्हणाले...

हेही वाचा -आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचा आघाडी सरकारने अपमान केला - संघटना

नेमकं काय झालं

खडसे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती सुरुवातीला मराठीत सांगितली. त्यानंतर हीच माहिती हिंदीत सांगण्यासाठी उपस्थितीत पत्रकारांनी विनंती केली. तेव्हा हीच माहिती खडसे यांनी हिंदीतही सांगितली. नंतर खडसे बाहेर जात असताना पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही सर्व माहिती आता इंग्लिशमधून सांगू का? असा प्रश्न खढसे यांनी विचारला आणि पत्रकारांमध्ये हशा पिकला.

चौकशीदरम्यान 'ईडी'ला सहकार्य करू - एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पुण्याजवळील भोसरी येथील भूखंडाच्या संबंधित व्यवहारांबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना ३० डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत बोलण्यासाठी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मोजक्या शब्दात उत्तरे दिली.

हेही वाचा - एकनाथ खडसेंवर आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा राष्ट्रवादीशी संबंध नाही - अ‌ॅड. रवींद्र पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.