ETV Bharat / state

एकनाथ खडसेंनी टाळली फडणवीसांची भेट; जामनेरच्या कार्यक्रमाला डच्चू

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात भाजपाने केलेल्या मुक्ताईनगरातील आंदोलनात एकनाथ खडसे सहभागी नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच गिरीष महाजनांनी ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. या कार्यक्रमातही खडसे अनुपस्थित राहिले.

devendra phadnavis in jalgaon
एकनाथ खडसेंनी टाळली फडणवीसांची भेट; जामनेरच्या कार्यक्रमाला डच्चू
author img

By

Published : Oct 13, 2020, 3:37 PM IST

जळगाव - जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पण कार्यक्रमाकडे भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. खडसेंनी जामनेरला येणे टाळले. सेच मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात भाजपाने केलेल्या मुक्ताईनगरातील आंदोलनातही ते सहभागी नसल्याची माहिती मिळत आहे.

पक्षात अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांचेच हे सर्व षडयंत्र असल्याचा आरोप गेल्या महिन्यात केला होता. तेव्हापासून खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली. गेल्या आठवड्यातच त्यांनी मुंबई वारी केली होती. यावेळी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. दुसरीकडे, या वातावरणात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज फडणवीस यांच्याहस्ते होत आहे.

महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते. यामुळे त्याठिकाणी खडसे-फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत उत्सुकता लागून होती. खडसेंनी मात्र, जामनेरला जाणे टाळले. त्यामुळे संभाव्य बहुचर्चित भेट अखेर झालीच नाही. खडसे प्रत्यक्ष जामनेरला गेले नसले, तरी त्यांनी महाजनांना फोन करून या प्रकल्पाबाबत शुभेच्छा दिल्या. हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खडसेंनी फडणवीसांची भेट नाकारल्याने त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून ते आता खरच पक्षांतर करतील का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, भाजपने आज मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. जळगावातही प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन झाले. मुक्ताईनगर तालुक्यात कोथळीच्या जुन्या मंदिरस्थळी भाजपने खासदार रक्षा खडसे, डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. मात्र, खडसे व त्यांच्या समर्थकांनी त्याकडे पाठ फिरवली. अवघ्या पाचच मिनिटांत हे आंदोलन आटोपले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.