ETV Bharat / state

ईडीकडून एकनाथ खडसेंची नेमकी कोणती मालमत्ता जप्त? महसूल विभागही अनभिज्ञ? चर्चांना उधाण

author img

By

Published : Aug 27, 2021, 2:00 PM IST

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खडसेंवर झालेल्या कारवाईबद्दल एकच चर्चा रंगली आहे.

Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने जोरदार दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खडसेंवर झालेल्या कारवाईबद्दल एकच चर्चा रंगली आहे.

नक्की कोणती मालमत्ता जप्त?

भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची या प्रकरणात दोनवेळा चौकशी झाली आहे. यातच आज ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त दिले आहे. पण ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेपैकी जळगावातील नेमक्या कोणत्या मालमत्तेचा समावेश आहे? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

महसूल विभागही कारवाईबाबत अनभिज्ञ?

ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने जळगाव आणि मुक्ताईनगर येथील तहसीलदारांशी संपर्क साधला. परंतु, त्यांनी महसूल विभागाकडे अशा स्वरूपाच्या कारवाईबाबतचे कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही. जप्त केलेली मालमत्ता देखील आपल्या कार्यक्षेत्रातली नाही, असे त्यांनी सांगितले.

जाणकारांचा अंदाज

'ईटीव्ही भारत'ने महसूल विभागातील जाणकार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जर समजा ईडीने शेतजमिनीशी संबंधित मालमत्ता जप्त केली असेल तर अशा स्वरूपाची कारवाई करण्यापूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचे पत्र दिले जाते. जप्त होणाऱ्या मालमत्तेचा तपशील त्यात असतो. संबंधित मालमत्तेवर महसूल विभागाचा बोजा बसवला जातो. मात्र, घर, बँकेतील रोकड व इतर ऐवज अशा स्वरूपाची जप्ती असेल तर मात्र ईडी थेट कारवाई करू शकते, असेही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - पाकचे घुसखोर हैदोस घालतात तसे...; म्हणून भाजपला शुध्दीकरणाची गरज - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.