जळगाव: मुक्ताईनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले जुने गावातील जितेंद्र गोपाळ नाथजोगी (४५ ) मुक्ताईनगर येथील एस.टी. मध्ये चालक म्हणुन कार्यरत होते. त्यांचे १७ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ह्यदयविकाराने मुक्ताईनगर येथील जुने गावातील जोगीवाडा येथे राहते घरी निधन झाले. त्यांच्या पश्च्यात आई , पत्नी , तीन भाऊ , १ बहिण, दोन मुले असा परिवार आहे.
अंत्यविधीसाठी तातडीची मदत
दुपारी १२ वाजता मुक्ताईनगर एस.टी. आगारातील विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक वाहक यांनी घरी येत त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. नंतर एसटी कडुन कुटुंबियांना पाच हजाराची मदत देण्यात आली. यावेळी आगारप्रमुख संदीप साठे , पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.
दुष्काळात तेरावा महिना
अतिशय कमी पगारात आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणारे राज्य परिवहन महामंडळाचे चालक वाहक हे आपल्या मागणीसाठी दोन महिन्यापासून बेमुदत संपावर आहेत. त्यावर शासन तोडगा काढत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच काहींना कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा गाडा तसेच पालनपोषण कसे करावे असे प्रश्न सतावत आहेत. अशा परिस्थितीत आतापर्यंत 50 कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे त्यातच मुक्ताईनगर येथील चालकाचा मृत्यू झाला.