ETV Bharat / state

जळगाव: एकनाथ खडसे- चंद्रकांत पाटील समर्थकांमध्ये धक्काबुक्की; 'हे' ठरले कारण

author img

By

Published : Oct 23, 2020, 6:25 PM IST

Updated : Oct 23, 2020, 6:54 PM IST

मुक्ताईनगरात खडसे समर्थकांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घराजवळ रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून खडसे आणि पाटील समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली.

घटनास्थळी पोलीस
घटनास्थळी पोलीस

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज दुपारी मुंबईत राष्ट्रवादीत जाहीरपणे प्रवेश केला. दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. आज दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

मुक्ताईनगरात खडसे समर्थकांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घराजवळ रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून खडसे आणि पाटील समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वाद वाढल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.

एकनाथ खडसे- चंद्रकांत पाटील समर्थकांमध्ये धक्काबुक्की

शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय हाडवैर आहे. हे मुक्ताईनगरातील हे दोन्ही नेते एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आमदार चंद्रकांत पाटील हे नाराज झाले आहेत. चंद्रकांत पाटील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. ते राष्ट्रवादीचे पुरस्कृत म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला चंद्रकांत पाटील यांचा विरोध होता. मात्र, तरीही खडसेंना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज आहेत.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पाटील समर्थकांच्या नाराजीचे पडसाद आज मुक्ताईनगरात उमटले. एकनाथ खडसे यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर खडसेंच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्या घराजवळ रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरून वाद झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना तेथून पांगवले. दरम्यान, हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. याप्रकरणी तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

Last Updated : Oct 23, 2020, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.