ETV Bharat / state

जळगाव : वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच एकनाथ खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र; दिव्यांग मंडळाचा दावा - दिव्यांग मंडळाची एकनाथ खडसेंना अपंगत्वावर प्रतिक्रिया

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळाने एकनाथ खडसे यांना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे. खडसेंच्या याच अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर निरनिराळ्या प्रकारचे आक्षेप घेतले जात आहेत.

jalgaon latest news
jalgaon latest news
author img

By

Published : Oct 9, 2021, 10:08 AM IST

Updated : Oct 9, 2021, 10:27 AM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सध्या त्यांनी मिळवलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आहेत. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळाने त्यांना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे. खडसेंच्या याच अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर निरनिराळ्या प्रकारचे आक्षेप घेतले जात आहेत. या विषयासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी, वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला आहे.

jalgaon latest news
jalgaon latest news

गिरीश महाजन यांनी घेतला होता सुरुवातीला आक्षेप -

एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर सर्वात आधी भाजप नेते गिरीश महाजन यांनी आक्षेप घेतला होता. खडसेंना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या प्रकारच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर खडसेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीही खडसेंच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे.

  • SHOCKING

    Lies after Lies

    Eknath Khadse's lawyer has made a statement before the Hon'ble Sessions court that Shri Khadse is PERMANENTLY DISABLED???

    Also that he has been admitted in an ICU and to undergo a LIFE SAVING SURGERY?

    Lies only to avoid physical appearance at court?

    — Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले डॉ. मारोती पोटे? -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाच्या तज्ञ डॉक्टरांनी एकनाथ खडसे यांना त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालांच्या आधारेच 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी खडसेंनी स्वतः दिव्यांग मंडळात तपासणीसाठी हजेरी लावून त्यांच्याकडे असलेले तपासणी अहवाल सादर केले. त्याची प्रत्यक्ष पडताळणी करून दिव्यांग मंडळाच्या डॉक्टरांनी त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे, अशी माहिती डॉ. पोटे यांनी दिली आहे.

'या' कारणांमुळे मिळाले प्रमाणपत्र -

एकनाथ खडसे यांना सर्व्हायकल स्पॉंडिलिसिस तसेच नी-जॉईंट प्रॉब्लेममुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचेही डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले. तसे वैद्यकीय तपासणीचे अहवाल त्यांच्याकडे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांना दिलेले प्रमाणपत्र हे टेम्पररी बेसिसवर असून ते एका वर्षाच्या कालावधीसाठी लागू असेल. औषधोपचाराने पुढे त्यांचे अपंगत्व कमी होऊ शकते किंवा वाढू पण शकते. त्यावेळच्या वैद्यकीय तपासणीत काय निदान होते, त्यावर ही बाब अवलंबून असेल, असेही डॉ. पोटे म्हणाले.

खडसेंनाच नाही तर अनेकांना मिळते असे प्रमाणपत्र -

एक हात किंवा पाय नसलेल्या अपंग व्यक्तीला देखील 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही, मग खडसेंना ते कसे मिळाले? असाही एक आक्षेप आहे. त्याबाबत बोलताना डॉ. मारोती पोटे म्हणाले, एकनाथ खडसे यांना डायबेटीस, न्यूरोसेन्सेशन असे अनेक आजार आहेत. त्यांना वेळोवेळी डायलिसीस करावे लागते. क्रोनिकल न्यूरोलॉजिकल कंडिशनमुळे बऱ्याच जणांना अशा प्रकारचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे फक्त खडसेंना हे कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असेही डॉ. पोटे यांनी सांगितले. शासनाने 2018 च्या शासन निर्णयानुसार 21 प्रकारच्या आजारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आजार त्यात समाविष्ट केले आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

Last Updated : Oct 9, 2021, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.