ETV Bharat / state

'कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू' - जळगाव राजकारण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. संजय राऊत यांची अवस्था सध्या 'घर का ना घाट का' अशी झाली आहे. ते सध्या संपादकही नाहीत. ज्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही ना, त्याला लक्ष वेधून घ्यावे लागते. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

बातचित करताना
बातचित करताना
author img

By

Published : Jun 1, 2021, 6:45 PM IST

जळगाव - सध्या आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहोत. त्यामुळे राजकीय सत्तांतरासारख्या विषयाकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू, असे सूचक विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. 1 जून) येथे केले.

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. माजीमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदूलाल पटेल आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी पीक विमा योजना, राज्यातील राजकीय परिस्थिती, मराठा आरक्षण अशा विषयांवर मते मांडली.

राज्य सरकारला 'डॅमेज कंट्रोल'ची खरी गरज

पक्षाच्या बांधणीसाठी हा दौरा करत आहात का, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॅमेज कंट्रोलची खरी राज्य सरकारला आहे. या सरकारवर रोज लागणारे गंभीर आरोप, सरकारची असलेली अवस्था आणि त्यातच पंढरपूरचा आलेला निकाल पाहता डॅमेज कंट्रोलची सरकारला गरज असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला. माझा दौरा आज संपत नाही. मी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी याठिकाणी आलो आहे. यापुढे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात मी जाणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे, त्याठिकाणी मी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कामच आहे. ज्यांचे डॅमेज होऊन राहिले आहे, त्यांना ते रोखायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या भेटीला राजकीय आयाम देण्याची गरज नाही

शरद पवारांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेचे खंडन करताना फडणवीस म्हणाले की, आपण फार संकुचित विचार करायला लागलो आहोत. राजकीय किंवा वैचारिक विरोधक अशी आपण महाराष्ट्रात एक संस्कृती पाळतो. आपण एकमेकांचे शत्रू नाहीत. शरद पवार हे आमचे वैचारिक विरोधक आहेत. पण, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांची खुशाली विचारण्यासाठी मी भेट घेतली. मला कोरोना झालेला होता तेव्हा शरद पवारांसह अनेक नेत्यांनी माझी फोनवर विचारपूस केली होती. तशी विचारपूस करण्यासाठी मी भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांच्या भेटीला राजकीय आयाम देण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रक्षा खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांनी मला मतदारसंघात आल्याने चहापाण्याचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षण प्रश्नी आम्हाला राजकारण करायचे नाही

मराठा आरक्षणाच्या विषयाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट भूमिका यापूर्वी मांडली आहे. पहिले तर त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र यावे म्हणून सांगितले. आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत. मी त्यांना सांगितले की, मराठा आरक्षण प्रश्नी आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला सरकारने बोलावले तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. नव्हे तर त्यांना पूर्ण सहकार्य करू. पण, त्यांनी राजकारण केले तर आम्ही राजकीय उत्तर देऊ. या प्रश्नी संभाजीराजे यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अकारण वाद घालू नये, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाले 'ते घर का ना घाट का'

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. संजय राऊत यांची अवस्था सध्या 'घर का ना घाट का' अशी झाली आहे. ते सध्या संपादकही नाहीत. ज्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही ना, त्याला लक्ष वेधून घ्यावे लागते. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जुन्या निकषांवर भरपाई मिळावी- देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.