ETV Bharat / state

जळगाव घरकुल घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांवर अद्यापही कारवाई नाही; महापालिका प्रशासन संशयाच्या घेऱ्यात

धुळे येथील विशेष न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल दिला.. त्यात दोषी ठरलेल्यांमध्ये भाजपचे पाच नगरसेवक देखील असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा
author img

By

Published : Nov 13, 2019, 5:21 PM IST

जळगाव - धुळे येथील विशेष न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल दिला. त्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकरांसह महापालिकेचे तत्कालीन अधिकारी आणि नगरसेवक दोषी ठरले आहेत. दोषी ठरलेल्यांमध्ये आता महापालिकेत भाजपचे प्रतिनिधित्व करणारे पाच नगरसेवक देखील असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, कायदेशीर बाबींचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाकडून शिक्षा सुनावलेल्या नगरसेवकांवर कारवाईसाठी टाळाटाळ सुरू आहे.

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा, दोषी नगरसेवकांवर कारवाईची मागणी

हेही वाचा... ऑस्ट्रेलियातील जंगलांना आग : न्यू साउथ वेल्समध्ये आपात्काळ जाहीर, 600 शैक्षणिक संस्था बंद

जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात दोन महिन्यांपूर्वी धुळे विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे आणि स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर या पाचही विद्यमान नगरसेवकांविरुद्ध काय कारवाई केली? याबाबतची सविस्तर माहिती जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे. या विषयासंदर्भात दीपक गुप्ता यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेसह महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. घरकुल घोटाळ्यात न्यायालयाचा निकाल येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. मात्र, तरीही दोषी नगरसेवकांवर कारवाई न केल्याने प्रशासन संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे.

हेही वाचा... महापौरपदाच्या आरक्षणाची आज सोडत; मुंबईसह 27 महापालिकांचा यात समावेश

दीपक गुप्ता यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर हादरलेल्या महापालिका प्रशासनाने तातडीने आपल्या विधी अधिकार्‍यांचा अभिप्राय मागवला आहे. सदर प्रकरणात कायदेशीररित्या काय कारवाई करता येईल? याबाबत विधी अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने दोषींना शिक्षा ठोठावली असून शिक्षेला दोन महिने उलटूनही स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे विधी अधिकार्‍यांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. या प्रकरणात महापालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी पडल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने केल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. शिवसेनेचा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला असला, तरी दोषी नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली थंडावल्या आहेत. दरम्यान, पाचही नगरसेवक अपात्र झाले तर भाजपला मोठा धक्का बसणार आहे. आपले पाचही नगरसेवक अपात्र होऊन नामुष्की ओढावून घेण्यापेक्षा त्यांचे राजीनामे घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

हेही वाचा... आरटीआयच्या चौकटीत सरन्यायाधीशांचे कार्यालय येणार? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय

Intro:जळगाव
धुळे येथील विशेष न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल दिला. त्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकरांसह महापालिकेचे तत्कालीन अधिकारी आणि नगरसेवक दोषी ठरले आहेत. दोषी ठरलेल्यांमध्ये आता महापालिकेत भाजपचे प्रतिनिधित्व करणारे पाच नगरसेवक देखील असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, कायदेशीर बाबींचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाकडून शिक्षा सुनावलेल्या नगरसेवकांवर कारवाईसाठी टाळाटाळ सुरू आहे.Body:तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात दोन महिन्यांपूर्वी धुळे विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे आणि स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर या पाचही विद्यमान नगरसेवकांविरुद्ध काय कारवाई केली? याबाबतची सविस्तर माहिती जळगावातील आरटीआय कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे. या विषयासंदर्भात दीपक गुप्ता यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेसह महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. घरकुल घोटाळ्यात न्यायालयाचा निकाल येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. मात्र, तरीही दोषी नगरसेवकांवर कारवाई न केल्याने प्रशासन संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे.

दीपक गुप्ता यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर हादरलेल्या महापालिका प्रशासनाने तातडीने आपल्या विधी अधिकार्‍यांचा अभिप्राय मागवला आहे. सदर प्रकरणात कायदेशीररित्या काय कारवाई करता येईल? याबाबत विधी अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने दोषींना शिक्षा ठोठावली असून शिक्षेला दोन महिने उलटूनही स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे विधी अधिकार्‍यांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.Conclusion:या प्रकरणात महापालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी पडल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने केल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. सेनेचा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला असला तरी दोषी नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली थंडावल्या आहेत. दरम्यान, पाचही नगरसेवक अपात्र झाले तर भाजपला मोठा धक्का बसणार आहे. आपले पाचही नगरसेवक अपात्र होऊन नामुष्की ओढावून घेण्यापेक्षा त्यांचे राजीनामे घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

बाईट: अजित मुठे, उपायुक्त, सामान्य प्रशासन (जांभळा शर्ट)
दीपक गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता (कपाळाला टिळा लावलेले)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.