ETV Bharat / state

औरंगाबाद-धुळे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत दोन जण ठार - जळगाव पोलीस प्रल्हाद राठोड न्यूज

प्रल्हाद राठोड हे जळगाव पोलीस दलात कार्यरत होते. ते याच वर्षी जळगाव येथून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बदलून आलेले होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून ते सेवारत होते. या अपघातात प्रल्हाद राठोड यांच्यासोबत त्यांचे मावस भाऊ रवींद्र राठोड हे देखील ठार झाले आहेत.

भरधाव कारच्या धडकेत दोन जण ठार,औरंगाबाद-धुळे महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Nov 1, 2019, 2:13 AM IST

जळगाव - औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात बुधवार रात्री साडेनऊच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावजवळ घडला. प्रल्हाद हिरामण राठोड (वय ३५) आणि रवींद्र तुळशीराम राठोड (वय ३०) अशी या अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा - मुख्य आठ क्षेत्रांच्या उत्पादनात सप्टेंबरमध्ये ५.२ टक्क्यांची घसरण

प्रल्हाद राठोड हे जळगाव पोलीस दलात कार्यरत होते. ते याच वर्षी जळगाव येथून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बदलून आलेले होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून ते सेवारत होते. या अपघातात प्रल्हाद राठोड यांच्यासोबत त्यांचे मावस भाऊ रवींद्र राठोड हे देखील ठार झाले आहेत. दोघेही दुचाकीवरून चाळीसगावकडून कन्नडच्या दिशेने जात होते. त्याच वेळी रांजणगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागल्याने हे दोघेही जागीच ठार झाले. प्रल्हाद राठोड यांच्याजवळ असलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.

death of two people  in accidental crash on aurangabad-dhule highway
प्रल्हाद राठोड यांच्याजवळ असलेले ओळखपत्र

औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

Intro:जळगाव
भरधाव जाणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात आज रात्री साडेनऊच्या सुमारास औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावजवळ घडला. प्रल्हाद हिरामण राठोड (वय ३५) आणि रवींद्र तुळशीराम राठोड (वय ३०) अशी या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.Body:प्रल्हाद राठोड हे जळगाव पोलीस दलात कार्यरत होते. ते याच वर्षी जळगाव येथून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बदलून आलेले होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून ते सेवारत होते. या अपघातात प्रल्हाद राठोड यांच्यासोबत त्यांचे मावस भाऊ रवींद्र राठोड हे देखील ठार झाले आहेत. दोघेही दुचाकीवरून चाळीसगावकडून कन्नडच्या दिशेने जात होते. त्याच वेळी रांजणगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. प्रल्हाद राठोड यांच्याजवळ मिळून आलेल्या त्यांच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.Conclusion:दरम्यान, औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.