ETV Bharat / state

अंधश्रद्धेचा कळस : मृत मुले जिवंत होतील म्हणून मृतदेह रात्रभर ठेवले मिठात - mehrun lake jalgaon

समाजमनावर अंधश्रद्धेचा किती मोठा पगडा आहे, याचा प्रत्यय जळगावात आला आहे. बुडून मृत्यू झालेली मुले जिवंत होतील या भाबड्या आशेने नोतेवाईकांनी मुलांचे मृतदेह रात्रभर मिठात ठेवले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशाचा आधार घेत त्यांनी हा प्रकार केला. विशेष म्हणजे हा प्रकार जिल्हा 'रुग्णालयात' झाला आहे.

मृत मुले
author img

By

Published : Aug 17, 2019, 9:29 AM IST

Updated : Aug 17, 2019, 10:01 AM IST

जळगाव - लोकांच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा अजूनही जात नसल्याचे जिवंत उदाहरण जळगावात पाहायला मिळाले आहे. तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेली दोन मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने त्यांचे मृतदेह चक्क दीड क्विंटल मिठात रात्रभर ठेवण्यात आले. समाजमाध्यमावरील एका संदेशाचा आधार घेत जळगाव जिल्हा रुग्णालयात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जळगाव जिल्हा रुग्णालयात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले महंमद उमेर जकी अहमद (वय १२) आणि महंमद अबूलैस जकी अहमद (वय १६) हे दोघे सख्खे भावंडे बुडून मरण पावले होते. ही भावंडे पुन्हा जिवंत होतील या भाबड्या आशेने त्यांच्या पार्थिवावर अघोरी उपाय करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात पाहायला मिळाला.

''एखाद्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यावर तीन ते चार तासांत त्याचा मृतदेह हाती आला तरी तो व्यक्ती जिवंत होऊ शकतो'', असा दावा करणारा एक संदेश समाजमाध्यमावर फिरत होता. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर दीड क्विंटल जाड मीठ टाकून काही तास तसेच ठेवले तर ती मृत व्यक्ती जिवंत होते, असा दावा या संदेशात करण्यात आला आहे. याच संदेशाचा आधार घेत मृत्यू झालेल्या दोन्ही बालकांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हा प्रकार करण्याची विनंती केली. रात्रीची वेळ असल्याने मृतदेहांवर विच्छेदन होणार नव्हते. म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाईकांना त्याची परवानगी दिली. त्यानुसार दोन्ही मृतदेह रात्रभर मिठात ठेवण्यात आले.

समाजमाध्यमावरील संदेशात मृत्यू झालेली व्यक्ती ४ तासात पुन्हा जिवंत होते, असा उल्लेख केलेला होता. म्हणून दोन्ही मुले जिवंत होतील, यासाठी ४ तास प्रतीक्षा करण्यात आली. परंतु, तसे झाले नाही. शेवटी मुलांच्या कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. या साऱ्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार संशयाच्या घेऱ्यात आला आहे.

Intro:जळगाव
लोकांच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा अजूनही जाता जात नसल्याचे जिवंत उदाहरण जळगावात पाहायला मिळाले आहे. तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेली दोन मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने त्यांचे मृतदेह चक्क दीड क्विंटल मिठात रात्रभर ठेवण्यात आले. समाजमाध्यमावरील एका संदेशाचा आधार घेत जळगाव जिल्हा रुग्णालयात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Body:जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले महंमद उमेर जकी अहमद (वय १२) आणि महंमद अबूलैस जकी अहमद (वय १६) हे दोघे सख्खे भावंडे बुडून मरण पावले होते. ही भावंडे पुन्हा जिवंत होतील या भाबड्या आशेने त्यांच्या पार्थिवावर अघोरी उपाय करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात पाहायला मिळाला. ''एखाद्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यावर तीन ते चार तासांत त्याचा मृतदेह हाती आला. तरी तो व्यक्ती जिवंत होऊ शकतो'', असा दावा करणारा एक संदेश समाजमाध्यमावर फिरत होता. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर दीड क्विंटल जाड मीठ टाकून काही तास तसेच ठेवले तर ती मृत व्यक्ती जिवंत होते, असा दावा या संदेशात करण्यात आला आहे. याच संदेशाचा आधार घेत मृत्यू झालेल्या दोन्ही बालकांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हा प्रकार करण्याची विनंती केली. असेही रात्रीची वेळ असल्याने मृतदेहांवर विच्छेदन होणार नव्हते. म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाईकांना त्याची परवानगी दिली. त्यानुसार मृत्यू पावलेल्या महंमद उमेर जकी अहमद आणि महंमद अबूलैस जकी अहमद यांचे मृतदेह रात्रभर मिठात ठेवण्यात आले.Conclusion:समाजमाध्यमावरील संदेशात मृत्यू झालेली व्यक्ती ४ तासात पुन्हा जिवंत होते, असा उल्लेख केलेला होता. म्हणून दोन्ही मुले जिवंत होतील, यासाठी ४ तास प्रतीक्षा करण्यात आली. परंतु, तसे झाले नाही. शेवटी मुलांच्या कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. या साऱ्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार संशयाच्या घेऱ्यात आला आहे.
Last Updated : Aug 17, 2019, 10:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.