ETV Bharat / state

'दैव बलवत्तर म्हणून वाचलो', तौक्ते वादळातून बचावलेल्या वैभव पाटीलची थरारक आपबिती - तौक्ते चक्रीवादळातून बचावलेल्या वैभव पाटीलची आपबिती

आठ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नौदलाचे जवान आमच्या मदतीला धावून आले. माझ्यासह सुमारे १८० जण या संकटातून बचावले, असा थरारक अनुभव वैभव माधवराव पाटील याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितला आहे.

तौक्ते वादळातून बचावलेल्या वैभव पाटीलची थरारक आपबिती

author img

By

Published : May 24, 2021, 3:42 PM IST

Updated : May 24, 2021, 4:01 PM IST

जळगाव - तौक्ते चक्रीवादळात आमच्या मॅथ्यू असोसिएशन कंपनीचे जहाज सापडले होते. वादळामुळे उंच उसळणाऱ्या लाटांमुळे जहाजात पाणी शिरले. आता सर्व संपले, आपण जिवंत वाचणार नाही, असे वाटले. जीव वाचवण्यासाठी जहाजातील ३०० जणांनी समुद्रात उड्या मारल्या. लाईफ जॅकेटच्या आधाराने तुफान लाटांना सामोरे गेलो. डोळ्यांदेखत अनेक सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. आठ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नौदलाचे जवान आमच्या मदतीला धावून आले. माझ्यासह सुमारे १८० जण या संकटातून बचावले, असा थरारक अनुभव जळगावातील वैभव माधवराव पाटील याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितला आहे.

'दैव बलवत्तर म्हणून वाचलो', तौक्ते वादळातून बचावलेल्या वैभव पाटीलची थरारक आपबिती

वैभव पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील गोविंद नगरी येथील रहिवासी आहे. तो मुंबईच्या मॅथ्यू असोसिएट या कंपनीत मर्चंट नेव्हीच्या फायरमन ब्रँचमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. तौक्ते चक्रीवादळातून सुखरूप बचावल्यानंतर तो घरी आला आहे. त्याने आपबिती कथन केली आहे.

'त्या दिवशी सकाळी उठलो अन्..'
वैभव म्हणाला, मुंबईपासून सुमद्रात ६० कि.मी. अंतरावर असलेल्या ओएनजीसीच्या हिरा फिल्डवर नोव्हेंबर २०२० पासून रवाना झालो होतो. माझ्यासह अनेक सहकारी या प्रकल्पावर कार्यरत आहे. काम सुरळीत सुरू होते. चार दिवसांचे काम अपूर्ण होते. ते आटोपून मुंबईत परतणार, तत्पूर्वीच तौक्ते वादळाचा संदेश जहाजाच्या कॅप्टनला मिळाला. जहाज समुद्रातून बाहेर काढण्याच्या सूचना देऊनही ओएनजीसीच्या हिरा फिल्डवरच थांबविले. १५ मेपासूनच वाऱ्यांचा वेग वाढला. १६ मे रोजी वाऱ्यासह लाटाही वाढल्या, रात्री १० पासून वादळाने रौद्ररूप धारण केले. रात्र कशीबशी काढली. १७ मे रोजी झोपेतून उठलो तर जहाजात पाणी शिरले होते. ते बाहेर फेकण्यासाठी आम्ही सर्व जण भिडलो. मात्र, वादळाचा वेग प्रचंड असल्याने लाटांपुढे आमचा निभाव लागला नाही. जहाजाचे सर्वच्या सर्व आठही नांगर लाटांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे जहाज प्रचंड हेलकावे खाऊ लागले.

जहाजाला भगदाड पडल्याने समुद्रात मारल्या उड्या
ओएनजीसीच्या प्लॅटफॉर्मला जोरात आदळल्याने जहाजाला भगदाड पडले. जहाजात पाणी प्रचंड वेगाने शिरत होते. १७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता जहाज समुद्रात बुडू लागले. समुद्रात उड्या घेण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. नौदलाकडे त्यापूर्वीच कॅप्टनने मदत मागितली होती. ती केव्हा मिळते, हे माहिती नव्हते. जहाज बुडू लागल्याने सायंकाळी ५.४० वाजता खवळलेल्या समुद्रात माझ्यासह ३०० जणांनी उड्या घेतल्या. लाईफ गार्डच्या सहाय्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होतो. नौदलाचे जवान आपल्याला वाचवतील या आशेवर धडपड करीत होतो, शेवटी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान नौदलाचे जहाज आमच्यापर्यंत पोहोचले. जवानांनी आमच्या दिशने सुरक्षाजाळी फेकली. ती हातात लागली अन जीव वाचला. मात्र तोपर्यंत दोंडाईचा येथील सहकारी मित्र योगेश गोसावीसह ५० जणांचा मृत्यू झाला होता. १८० जण बचावले. नौदलाच्या जहाजाने आम्हाला मुंबईला आणले व दोन दिवसांपूर्वी मी पाचोऱ्यात आलो. दैव बलवत्तर असल्याने मी बचावलो. काही चांगल्या कर्माचे फळ व मित्रांचा तसेच जनतेचा आशीर्वादही कामी आला, असे वैभव म्हणाला.

आई-वडिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून आपला एकुलता एक मुलगा बचावल्याने व तो सुखरूप घरी परतल्याने आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. ज्यावेळी वादळामुळे जहाज बुडाले, याची माहिती मुंबईवरून मिळाली तेव्हा तर आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. आपला मुलगा घरी परत येणार नाही, हा विचार मनात आला. पण परमेश्वराच्या कृपेने तो आज आपल्यात आहे, अशी भावना वैभवच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

हेही वाचा - COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी

Last Updated : May 24, 2021, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.