ETV Bharat / state

अमळनेरमधील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार, ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह - जळगाव न्यूज

अमळनेरमधील 31 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील रुग्ण संख्या 100 वर पोहोचली आहे. सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अमळनेरमध्ये समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

author img

By

Published : May 9, 2020, 11:51 AM IST

जळगाव- जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमळनेरमध्ये तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात अमळनेर शहरातील 31 व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या शंभरावर गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 157 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी आणखी 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यापैकी 71 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये चोपडा तालुक्यातील अडावद येथील एक, अमळनेर येथील 31 असा एकूण 32 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 157 इतकी झाली असून त्यापैकी 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अमळनेरात समूह संसर्ग?

अमळनेर शहरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे या ठिकाणी समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अमळनेरातील बाधितांची संख्या शुक्रवारी 69 होती. त्यात आज पुन्हा 31 रुग्णांची भर पडली असून, ती 100 वर पोहचली आहे. दरम्यान, पाचोरा शहरात देखील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. तसा अहवाल प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त झाला होता.

कोरोना अपडेट्स-

अमळनेर- पॉझिटिव्ह 100, मृत्यू 8

भुसावळ- पॉझिटिव्ह 21, मृत्यू 4

जळगाव- पॉझिटिव्ह 14, मृत्यू 2

पाचोरा- पॉझिटिव्ह 15, मृत्यू 3

चोपडा- पॉझिटिव्ह 5, मृत्यू 1

मलकापूर आणि बुलढाणा- पॉझिटिव्ह 2

एकूण पॉझिटिव्ह 157, मृत्यू 18

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.