ETV Bharat / state

बनावट कागदपत्रांद्वारे खटोड बंधूकडून कोट्यवधीचे भूखंड हडप- अजय ललवाणी - Ajay Lalvani in jalgaon

श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे श्रीराम खटोड, श्रीकांत खटोड यांनी मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप केल्याचा आरोप अजय ललवाणी यांनी केला आहे.

Ajay Lalvani
Ajay Lalvani
author img

By

Published : Dec 25, 2020, 10:05 PM IST

Updated : Dec 25, 2020, 10:17 PM IST

जळगाव - राजकारणातील वरिष्ठ मंडळींसोबतचे असलेले हितसंबंध, प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे श्रीराम खटोड, श्रीकांत खटोड यांनी मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप केल्याचा आरोप अजय ललवाणी यांनी पत्रकार परिषद केला. नगर विकास विभागाने या प्रकरणी मनपा आयुक्तांना बांधकाम जैसे थे ठेवावे, असे आदेश दिले असतानाही त्याकडे मनपाकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही ललवाणी यांनी केला आहे.

अजय ललवाणी

३० कोटी रुपयांचे भूखंड लाटले-

पत्रकार परिषदेत अजय ललवाणी यांच्यासह राजेश ललवाणी, पुनीत ललवाणी, बांधकाम व्यावयासिक सुमित मुथा, मेहरुण परिसरातील जमीन हडप झालेल्या जागा परिसरातील रहिवासी सरिता सरकार उपस्थित होते. यावेळी ललवाणी यांनी सांगितले की, मेहरुण तलावाजवळ असलेल्या सुमारे २३ एकर जमिनीच्या ले आऊटमध्ये शासनाची दिशाभूल करुन तसेच बनावट कागदपत्र तयार करुन खटोड बंधुंनी ले आऊटमध्ये परस्पर बदल करीत परिसरातील सुमारे ३० कोटी रुपयांचे ४० हजार स्केअरफुटाचे खुले भूखंड लाटले आहेत. यामध्ये तत्कालीन महापालिका मुख्याधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून कोणतीही मोजणी न करता मूळ दस्तावेजांमध्ये थेट फेरफार करून तत्कालीन तलाठ्याला हाताशी धरून उतारा तयार करण्यात आल्याचेही ललवाणी म्हणाले. तेथील रहिवाशांच्या हक्काची जागा म्हणजेच खुला भूखंड याचे चार प्लॉट निर्माण करून एक प्लॉट श्रीराम व श्रीकांत खटोड यांचे व्यावसायिक हितसंबंध असलेले रामसहाय शर्मा यांना विकण्यात आल्याचे ललवाणी यांनी सांगितले. उर्वरित तीन प्लॉट खटोड बंधूंनी २००८ चे श्री डेव्हलपर्स व २०११ पासूनचे श्री श्री इन्फ्रास्टक्चर यांनी ही जागा लाटून त्यांनी एका प्लॉटवर अनधिकृत सहा मजली इमारत म्हणजेच 'श्री श्री लेक कॅसल'ची उभारणी करीत फ्लॅटची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला.

बिल्डरवर कारवाई करावी-

सर्व नियम धाब्यावर बसवून हा ओपन स्पेस कमी करण्यात आला, असा आरोप ललवाणी यांनी केला. त्यामुळे संबंधित प्रशासन व ओपन प्लॉटधारक, बिल्डर हे यात गुन्हेगार ठरतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Last Updated : Dec 25, 2020, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.