ETV Bharat / state

बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला.. नगरसेवकास अटक

या गुन्ह्यात सोमवारी जळगाव शहर पोलिसांनी नगरसेवक प्रवीण देवीदास कोल्हे (वय ३२, रा. कोल्हेवाडा, जुने जळगाव) याला अटक केली. त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

jalgaon city police
jalgaon city police
author img

By

Published : Apr 21, 2020, 11:31 AM IST

जळगाव - शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्याकडे खंडणी मागत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १६ जानेवारीला घडली होती. या गुन्ह्यात सोमवारी जळगाव शहर पोलिसांनी नगरसेवक प्रवीण देवीदास कोल्हे (वय ३२, रा. कोल्हेवाडा, जुने जळगाव) याला अटक केली. त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खुबचंद साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी चारचाकी देण्यास टाळाटाळ केली होती. तसेच साहित्या यांच्याकडून खंडणी मागितली होती. १६ जानेवारी २०२० रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील गोरजाबाई जिमखाना येथे साहित्या गेले होते. यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पिस्तुलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण केली होती. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी साहित्या यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पाेलीस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जबरदस्तीने वसुली, लबाडीच्या इराद्याने वस्तुची परस्पर विक्री, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात आत्तापर्यंत ४ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघे सध्या कारागृहात आहेत. तर सोमवारी नगरसेवक प्रवीण कोल्हे याला अटक केली. कोल्हे याला न्यायाधीश सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता, ६ दिवसांची (२६ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुण निकम तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.