ETV Bharat / state

खळबळजनक..! कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह आढळला रुग्णालयाच्या शौचालयात, ५ दिवसांपासून होती बेपत्ता - कोरोनाबाधित महिला मृतदेह प्रकरण जळगाव

काेविड रुग्णालयातील डॉक्टरांनी वृद्धेच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीस वृद्धेचा शोध घेत होते. या घटनेमुळे कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. असे असताना बुधवारी सकाळी ७ क्रमांकाच्या वॉर्डातील शौचालयातून दुर्गंधी येऊ लागली. शौचालयाची कडी आतून बंद होती. सफाई कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर हा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आतील दृश्य मन हेलावणारे होते. शौचालयात गेल्या ५ दिवसांपासून ती भुसावळची वृद्धा मरून पडलेली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

jalgaon corona update  corona patients dead body issue  jalgaon latest news  जळगाव कोविड रुग्णालय  जळगाव कोरोना अपडेट
बेपत्त कोरोना महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयामध्ये, जळगावातील कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार
author img

By

Published : Jun 10, 2020, 1:49 PM IST

Updated : Jun 10, 2020, 3:13 PM IST

जळगाव - शहरातील काेविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत असलेली एक ८२ वर्षीय वृद्ध महिला ५ जूनपासून बेपत्ता झाली होती. या बेपत्ता वृद्धेचा मृतदेह बुधवारी सकाळी कोविड रुग्णालयातील ७ क्रमांकाच्या वॉर्डातील शौचालयात आढळून आला. ५ दिवस हा मृतदेह शौचालयात पडून होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

खळबळजनक..! कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह आढळला रुग्णालयाच्या शौचालयात, ५ दिवसांपासून होती बेपत्ता

मूळ भुसावळ येथे राहणारी ही महिला १ जूनला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तेथील रेल्वेच्या रुग्णालयातून जळगावात दाखल झाली होती. यानंतर २ जूनला ही महिला बेपत्ता झाली होती. ३ जूनला पुन्हा ती कोविड रुग्णालयातच आढळून आली. यानंतर ५ जूनपासून ती पुन्हा बेपत्ता झाली होती. याप्रकरणी काेविड रुग्णालयातील डॉक्टरांनी वृद्धेच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीस वृद्धेचा शोध घेत होते. या घटनेमुळे कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. असे असताना बुधवारी सकाळी ७ क्रमांकाच्या वॉर्डातील शौचालयातून दुर्गंधी येऊ लागली. शौचालयाची कडी आतून बंद होती. सफाई कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर हा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आतील दृश्य मन हेलावणारे होते. शौचालयात गेल्या ५ दिवसांपासून ती भुसावळची वृद्धा मरून पडलेली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृत वृद्धेची ओळख पटवली. ही वृद्धा ५ दिवसांपासून शौचालयात पडून होती. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, वॉर्डातील इतर रुग्ण यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही? हा प्रश्न आता समोर आला आहे. दरम्यान, बुधवारी या वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह -

या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, तरीही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत असंख्य तक्रारी असताना कोणीही जबाबदारी स्वीकारायला पुढे येत नसल्याच्या आरोप आता सामजिक संघटनांकडून होऊ लागला आहे.

घटना गंभीर, शासनाला अहवाल पाठवू - जिल्हाधिकारी

दरम्यान, या घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, ही घटना अतिशय गंभीर आहे. कोविड रुग्णालयात असा प्रकार घडणे म्हणजे निश्चितच हलगर्जीपणा झाला आहे. दिवसातून किमान दोन वेळा शौचालय स्वच्छ होणे गरजेचे आहे. असे असताना वृद्धेचा शौचालयात मृत्यू होणे आणि ही बाब लक्षात न येणे, हे गंभीर आहे. या प्रकाराची तातडीने सखोल चौकशी होईल. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार संबंधितांवर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले.

Last Updated : Jun 10, 2020, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.