ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम; सोमवारी 596 नवे बाधित, 6 रुग्णांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यात 596 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले.

Corona outbreak continues in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम
author img

By

Published : Mar 9, 2021, 3:08 AM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यात 596 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. तर 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसून जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही घटून 90.69 टक्के तर मृत्यूदर 2.36 टक्के इतका आहे.

जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालांमध्ये सोमवारी 596 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65 हजार 138 इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे, सोमवारी दिवसभरात 301 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 58 हजार 836 इतकी आहे.

हॉटस्पॉट असलेल्या जळगावात परिस्थिती गंभीर-

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सोमवारी देखील जळगाव शहरात 275 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. त्या खालोखाल 81 रुग्ण चाळीसगाव तालुक्यात आढळले आहेत. जळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.

असे आढळले नवे बाधित-

सोमवारी जळगाव शहरात 275, जळगाव ग्रामीण 33, भुसावळ 59, अमळनेर 9 चोपडा 48, यावल, भडगाव, पाचोरा प्रत्येकी 1, धरणगाव 6, जामनेर 36, रावेर 14, पारोळा 18, चाळीसगाव 81, मुक्ताईनगर 7, बोदवड 2 तसेच इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 596 नवे बाधित समोर आले आहेत.

अशी आहे आकडेवारी

  • ऍक्टिव्ह रुग्ण- 4892
  • लक्षणे असलेले रुग्ण- 1054
  • लक्षणे नसलेले रुग्ण- 3838
  • होम क्वारंटाईन असलेले रुग्ण- 3380
  • कोविड केअर सेंटरमधील रुग्ण- 458
  • विलगीकरणातील रुग्ण- 114
  • डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील रुग्ण- 560
  • डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण- 494
  • ऑक्सिजनवरील रुग्ण- 195
  • आयसीयूमध्ये असलेले रुग्ण- 143

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.