ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: 'चार महिने झाले हाताला काम नाही, कोरोनाने नंतर... पण आधी उपासमारीने मरू'

author img

By

Published : Jul 14, 2020, 1:15 PM IST

कोरोनामुळे उद्योग-धंदे, छोटे-मोठे व्यवसाय असे सारे काही बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांना जगण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर शहरात कानाकोपऱ्यात पडलेला कचरा तसेच भंगार वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

corona-impact-on-scrap-market-in-jalgaon
'चार महिने झाले हाताला काम नाही,

जळगाव- कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून हाताला काम नाही. त्यामुळे रोज दिवस उगवला की दोन वेळच्या घासाची चिंता सतावते. मागून काही मिळालं तर ठीक, नाही तर पोरंबाळांसह उपाशीच झोपावे लागते. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात मिळणारी मदतही आता बंद झाली आहे. अजून किती दिवस अशी परिस्थिती राहील सांगता येत नाही. आता जगायचं तरी कसं? आमच्यावर अक्षरशः मरणाची वेळ आली आहे, अशी उद्विगता जळगावातील कचरा आणि भंगार वेचणाऱ्या कुटुंबांनी व्यक्त केली. दरम्यान, टाळेबंदीमुळे भंगार व्यवसाय देखील ठप्प असल्याने लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनामुळे उद्योग-धंदे, छोटे-मोठे व्यवसाय असे सारे काही बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांना जगण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर शहरात कानाकोपऱ्यात पडलेला कचरा तसेच भंगार वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यांची परिस्थितीही अतिशय बिकट आहे. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने जळगावातील कचरा आणि भंगार वेचणाऱ्या कुटुंबांपर्यंत जाऊन त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

जळगावात रामेश्वर कॉलनी, मेहरूण, शिवाजीनगर, पिंप्राळा-हुडको, समतानगर, मटण मार्केट परिसर अशा ठिकाणी कचरा आणि भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी शेकडो कुटुंब वास्तव्यास आहेत. या साऱ्या कुटुंबांचा विचार केला तर सुमारे तीन ते साडेतीन हजार लोकांना कोरोनामुळे आज दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. दिवसभर कचरा, भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणारे हे लोक आज जगण्यासाठी धडपडत आहेत. कोरोनामुळे राज्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली. तेव्हा अनेक सेवाभावी संस्था, संघटना, राजकीय पक्ष गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले होते. तेव्हा कचरा आणि भंगार वेचणाऱ्या कुटुंबांनाही काहीसा आधार मिळाला होता. परंतु, कोरोनाच्या संसर्गाबरोबर टाळेबंदीही वाढत गेल्याने गोरगरीब लोकांना बाहेरून मिळणाऱ्या मदतीचा ओघही आटत गेला. कचरा आणि भंगार वेचणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती देखील यापेक्षा निराळी नाही. त्यांच्यासमोर असंख्य अडचणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

'चार महिने झाले हाताला काम नाही...
जळगावातील मटण मार्केट परिसरात कचरा व भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणारी सव्वाशे ते दीडशे कुटुंब वास्तव्याला आहेत. याठिकाणी राहणाऱ्या हिरुबाई भील आणि तोलाबाई नाईक यांनी आपल्या भावना 'ईटीव्ही भारत'कडे व्यक्त केल्या. आम्ही कचरा, भंगार गोळा करून आमचा उदरनिर्वाह करतो. पोट भागेल, एवढेच पैसे मिळतात. त्यात घर चालवावे लागते. पण कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून आमच्या हाताला काम नाही. सुरुवातीला दानशूर लोक अन्न-पाणी घेऊन यायचे. त्यावर भागले. नंतर टाळेबंदीत काहीशी सूट मिळाली. पण तरी हाताला काम नसल्याने अडचणी कायम होत्या. मग इकडेतिकडे मागून भागवलं. आता पुन्हा टाळेबंदी असल्याने उपासमारी होत आहे. जगायचं तरी कसं, हा प्रश्न असल्याचे हिरुबाई भील यांनी सांगितले.

तोलाबाई नाईक यांची तर परिस्थिती खूपच बिकट आहे. त्यांना कुणीही नसल्याने झोपडीत त्या एकट्या राहतात. दिवसभर कचरा वेचायचा, मिळेल त्यात भागावायचे. पण आता तर टाळेबंदीमुळे बाहेर फिरता येत नाही, कुणी मदतही करायला येत नाही. ना घर-ना दार, ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड अशा परिस्थितीत कोणत्याही शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. तरीही त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. कोरोनामुळे गोरगरीब लोकांचे जगणं कठीण झाले आहे. सरकारने माझ्यासारख्या निराधार लोकांची किमान खायची व्यवस्था तरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाने नंतर पण आधी उपासमारीने मरू..

शहरातील मेहरुण परिसरातील झोपडपट्टीत राहणारे मंगा भील यांना तर आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरून आले होते. कोरोनामुळे आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भंगार गोळा करून दिवसभरात शंभर ते दीडशे रुपये मिळतात. एवढ्यावर कसबसे भागवावे लागते. पण आता तर भंगार गोळा करायला जाता येत नाही. दुसरं काही काम मिळते का? हे पाहायला बाहेर पडलं की पोलीस मारतात. किती दिवस बसून राहणार. खायचेच वांदे झाले आहेत.
आम्ही कोरोनाने नंतर; पण आधी उपासमारीने मरू. सरकारने आमचा विचार करायला हवा, असे मंगा भील म्हणाले.

भंगार बाजारही बंदच, हजारो रुपयांची उलाढाल ठप्प...
जळगाव शहरातील नेरीनाका परिसरात सर्वात मोठा भंगार बाजार आहे. या बाजारात सुमारे दीडशे ते दोनशे व्यावसायिक आहेत. मात्र, कोरोनामुळे हा बाजार बंद असून, हजारो रुपयांची उलाढाल थांबली आहे. या भंगार बाजारावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरगुती भंगार साहित्य, औद्योगिक वसाहतीतून निघणारे भंगार तसेच जीर्ण झालेल्या वाहनांचे स्पेअर पार्ट याठिकाणी खरेदी-विक्री होतात. येथून हा माल धुळे, मालेगाव येथील भंगार बाजारात विक्री होतो. या बाजारात महिन्याकाठी किमान 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल होते. टाळेबंदीमुळे ही उलाढाल ठप्प झाली असून त्यामुळे भंगार व्यावसायिक, या व्यवसायावर अवलंबून असलेली वाहने, कर्मचारी अशा सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती भंगार व्यावसायिक मोहम्मद शेख जुनेद शेख यांनी दिली. सरकारने भंगार व्यवसायाबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.