ETV Bharat / state

जळगावात दोन दिवसातच तापमानात तब्बल १२ अंशाची घट; किमान तापमान १४ अंशांवर - जळगाव वातावरण

येणाऱ्या तीन महिन्यात जर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही. तर जिल्ह्यात कोरडे हवामान पाहायला मिळेल. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना जिल्ह्यात येण्यास ब्रेक लागणार नाही. यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

jalgoan cold
जळगाव थंडी
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:54 PM IST

जळगाव- मान्सूनने आता पूर्णपणे माघार घेतली असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम देखील कमी झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना महाराष्ट्रात येण्यास अडचण आता जवळपास संपली आहे. जिल्ह्याचे वातावरण पूर्णपणे कोरडे होवून उत्तरेकडील वाऱ्यांचे आगमन जिल्ह्यात झाले आहे. यामुळे दोन दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. दोन दिवसात किमान तापमानात तब्बल १२ अंशांची घट झाली आहे. गुरुवारी शहराचा किमान पारा १४ अंशापर्यंत खाली आला होता. यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा अनुभवायला मिळू लागला आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला देखील होणार आहे. कोरडवाहू जमिनीवर देखील हरभरा, ज्वारी, मक्याचे चांगले उत्पादन होवू शकते. त्यातच थंडीचे प्रमाण चांगले राहिले तर गहूला देखील चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यातच चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा असल्याने पिकांना फायदा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील पावसाची सरासरी लक्षात घेतली तर सरासरीपेक्षा देखील जास्त पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीत पुरेसे पाणी मुरले आहे. हिवाळ्यात हेच पाणी दव बनून जमिनीबाहेर येत असते. त्यातच येणाऱ्या तीन महिन्यात जर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही. तर जिल्ह्यात कोरडे हवामान पाहायला मिळेल. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना जिल्ह्यात येण्यास ब्रेक लागणार नाही. यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

पाच वर्षात ऑक्टोबर महिन्यात पारा १४ अंशावर -

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या व नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात किमान तापमान हे १८ ते २० अंशापर्यंत असते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यात १४ अंशापर्यंत पारा खाली गेला आहे. तब्बल पाच वर्षानंतर ऑक्टोबर महिन्यात किमान तापमान १५ पेक्षा खाली आहे. त्यामुळे यंदा थंडीचा कडाका अधिक जाणवू शकतो. दरम्यान, अद्याप हिमाचल प्रदेश, जम्मु काश्मीर या राज्यांमध्ये काहीच ठिकाणी बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. या राज्यांमध्ये बर्फवृष्टीचे प्रमाण वाढल्यास जिल्ह्यात देखील थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

आगामी पाच दिवसांचा अंदाज असा -

तारीख - किमान तापमान - कमाल तापमान
३० ऑक्टोबर - १४ - ३४
३१ ऑक्टोबर - १३ - ३३
१ नोव्हेंबर - १४ - ३३
२ नोव्हेंबर - १२ - ३३
३ नोव्हेंबर - १२ - ३२

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.