ETV Bharat / state

शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी अन् हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करू - उद्धव ठाकरे

शेतकरी हा आपल्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहील. सरकार आपलंच आहे, हे समजून प्रत्येक शेतकऱ्याने पुढे पाऊल टाकलं पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 15, 2020, 6:02 PM IST

Updated : Feb 15, 2020, 6:29 PM IST

जळगाव - कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा उपाय नाही. कर्जमाफी हा केवळ प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष कृती आराखडा तयार करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जळगाव येथे दिले.

उद्धव ठाकरे

सिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दुपारी 2 वाजता जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या वतीने सन 2018-19 साठी हा पुरस्कार जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांना जाहीर करण्यात आला होता. मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते चव्हाण दाम्पत्याला हा पुरस्कार वितरित करण्यात आला. शाल-श्रीफळ, 2 लाख रुपये रोख तसेच स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा - 'शेतकऱ्यांना सात-बारा घेऊन फिरण्याची गरज नाही, ऑनलाइन सात-बारा ग्राह्य ठरेल'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शेतकरी हा आपल्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहील. सरकार आपलंच आहे, हे समजून प्रत्येक शेतकऱ्याने पुढे पाऊल टाकलं पाहिजे. राज्याच्या सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ही योजना चालू महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात सुरू होईल. शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचे कसे बाहेर काढायचे? हे पाहणार आमचं सरकार आहे. प्रत्येक शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत; म्हणून शासन कृतिशील कार्यक्रम तयार करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच मुबलक पाणी हवे आहे, याची मला कल्पना आहे. त्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भारताला संपन्न आणि बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर शेती आणि शेतकऱ्यांना सन्मान द्यावा लागणार आहे. सरकार एवढ्यावरच थांबणार नाही तर विचार आणि कृतीची सांगड घालत शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. देशात जसे राजकारणाचे वारे वाहतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कृषीचे वारे देशभर पसरावेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्राच्या सहकार्याची गरज- शरद पवार

शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबवण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्राने राज्याला सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले तर त्यांचे जीवनमान बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान बदलल्यानंतर गावाचे परिणामी देशाचे स्वरूप बदलल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांनी दिलेल्या सत्तेच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. या कामी त्यांना माझ्यासह तुमची साथ गरजेची आहे. आज शेतकऱ्यांपुढे असंख्य प्रश्न आहेत. मात्र, अशा बिकट परिस्थितीवर मात करून शेतकरी पुढे जात आहे. उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान आत्मसात करायचे. समाजाची तसेच आपल्या कुटुंबाची गरज भागवायची. हे शेतकरी करतोय म्हणूनच भारताचे नाव जगभरात घेतले जात आहे. ज्याप्रमाणे वैज्ञानिकांना याचे श्रेय जाते तसेच श्रेय काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनाही द्यावे लागेल, असेही यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा - राज ठाकरेंची अवस्था 'तुम्हारे खत में हमारा सलाम'; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची खरमरीत टीका

Last Updated : Feb 15, 2020, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.