ETV Bharat / state

महाआघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार, भुजबळांनी घेतली यांची नावे - मायावती

सध्या देशात मोदींच्या विरोधात प्रवाह वाहत आहे. काहीही झाले तरी आता मोदी सरकार या देशात येणार नाही. त्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती असे सारे एकत्र येऊन या देशाचा पंतप्रधान कोण होईल ते ठरवतील. पण मोदी म्हणतात की तुमचा पंतप्रधान कोण आहे ते आधी सांगा. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

कोळगाव येथील प्रचार सभेत बोलताना छगन भुजबळ
author img

By

Published : Apr 13, 2019, 8:33 PM IST

Updated : Apr 13, 2019, 9:15 PM IST

जळगाव - पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या विषयावरून भाजपकडून महाआघाडीवर होणाऱ्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिले. महाआघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत. राहुल गांधी, शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात. ममता बॅनर्जी किंवा मायावती हे पण पर्याय आहेत. तुमच्यापेक्षा चांगले काम करणारे मनमोहनसिंगदेखील आमच्याकडे आहेत, असे सांगून भुजबळ यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

कोळगाव येथील प्रचार सभेत बोलताना छगन भुजबळ

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ बोलत होते. सभेला उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, की या देशात मोदींच्या विरोधात प्रवाह वाहत आहे. काहीही झाले तरी आता मोदी सरकार या देशात येणार नाही. त्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती असे सारे एकत्र येऊन या देशाचा पंतप्रधान कोण होईल ते ठरवतील. पण मोदी म्हणतात की तुमचा पंतप्रधान कोण आहे ते आधी सांगा. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी भाजप सरकारच्या ५ वर्षाच्या कारकिर्दीवर टीकास्त्र सोडले. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, उद्योजक उद्ध्वस्त झाले. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. आता मते मागता येतील अशी ठोस कामे त्यांच्याकडे सांगायला नाहीत. म्हणून ते सैनिकांच्या नावाने मते मागत आहेत. पण निवडणुकीला सैनिक उभे आहेत का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

चौकीदार...कसला चौकीदार ?

मोदी म्हणतात की मी देशाचा चौकीदार आहे. पण ते कसले चौकीदार आहेत. विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून देश सोडून पळून जात आहेत. दुसरीकडे राफेल प्रकरणाची कागदपत्रेही चोरीस जात आहेत आणि मोदी म्हणतात, मी चौकीदार आहे. हा कसला आणि कुठून आला चौकीदार, अशी टीका भुजबळांनी केली. आपण आपल्या शेतात किंवा घरात चौकीदार ठेवतो. त्यानंतर शेतात किंवा घरात चोरी झाली तर सर्वात आधी चौकीदाराचीच चौकशी करतो ना. पण मोदी चौकशीला सामोरे जाण्यास टाळत असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले.

Intro:Feed send to FTP
जळगाव
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या विषयावरून
भाजपकडून महाआघाडीवर होणाऱ्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाआघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत. राहुल गांधी, शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात. ममता बॅनर्जी किंवा मायावती हे पण पर्याय आहेत. तुमच्यापेक्षा चांगलं काम करणारे मनमोहनसिंग देखील आमच्याकडे आहेत, असं सांगून भुजबळ यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.Body:भुजबळ पुढे म्हणाले की, या देशात मोदींच्या विरोधात प्रवाह वाहतोय. काहीही झालं तरी आता मोदी सरकार या देशात येणार नाही. त्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती असे सारे एकत्र येऊन या देशाचा पंतप्रधान कोण होईल ते ठरवतील. पण मोदी म्हणतात की तुमचा पंतप्रधान कोण आहे ते आधी सांगा. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ बोलत होते. सभेला उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख आदी उपस्थित होते.

छगन भुजबळ यांनी यावेळी भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीवर टीकास्त्र सोडलं. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, उद्योजक उद्ध्वस्त झाले. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलंय. आता मते मागता येतील, अशी ठोस कामे त्यांच्याकडे सांगायला नाहीत. म्हणून ते सैनिकांच्या नावाने मते मागत आहेत. पण निवडणुकीला सैनिक उभे आहेत का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.Conclusion:चौकीदार... चौकीदार... कसला चौकीदार-

मोदी म्हणतात की मी देशाचा चौकीदार आहे. पण ते कसले चौकीदार आहेत. विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून देश सोडून पळून जात आहेत. दुसरीकडं राफेल प्रकरणाची कागदपत्रेही चोरीस जात आहेत आणि मोदी म्हणतात, मी चौकीदार आहे. हा कसला आणि कुठून आला चौकीदार, अशी टीका भुजबळांनी केली. आपण आपल्या शेतात किंवा घरात चौकीदार ठेवतो. त्यानंतर शेतात किंवा घरात चोरी झाली तर सर्वात आधी चौकीदाराचीच चौकशी करतो ना... पण मोदी चौकशीला सामोरं जाणं टाळताय, असेही ते म्हणाले.
Last Updated : Apr 13, 2019, 9:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.