ETV Bharat / state

'सीसीआय'च्या केंद्रावर शेतकऱ्यांचा नाही तर जिनर्सच्या कापसाची खरेदी; 'हेराफेरी'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

author img

By

Published : May 13, 2020, 5:37 PM IST

कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालापेक्षा जिनर्स व व्यापाऱ्यांचाच माल जास्त खरेदी केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सीसीआयचे अधिकारी आणि जिनर्समध्ये साटेलोटे असल्याने हा प्रकार सुरू आहे.

'हेराफेरी'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष
'हेराफेरी'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव - लॉकडाऊनमध्ये तब्बल दीड महिन्यानंतर जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र, याठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना निकषांचे कारण पुढे करत नकार दर्शवला जात आहे. तर, जिनर्सकडून कोणत्याही निकषांविना कापूस खरेदी केली जात आहे. काही जिनर्स शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी करून, आपला माल सीसीआयच्या केंद्रावर विक्री करत आहेत. जिनर्सच्या या हेराफेरीमुळे गरजू शेतकऱ्यांना आपला मालच विक्री करता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुसरीकडे, या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

'सीसीआय'च्या केंद्रावर शेतकऱ्यांचा नाही तर जिनर्सच्या कापसाची खरेदी

यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दुर्दैवी वेळ आली आहे. कापसाला भाव चांगला मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल सुरुवातीला विक्रीसाठी आणला नव्हता. पुढे लॉकडाऊन झाल्यामुळे जिनींग व शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद झाले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. आता कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालापेक्षा जिनर्स व व्यापाऱ्यांचाच माल जास्त खरेदी केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सीसीआयचे अधिकारी आणि जिनर्समध्ये साटेलोटे असल्याने हा प्रकार सुरू आहे.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांकडून माल खरेदी असताना अनेक खासगी जिनर्स व व्यापाऱ्यांनी ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी केला. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व जिनींग व शासकीय खरेदी केंद्र देखील बंद झाले. तब्बल दीड महिन्यानंतर शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाप्रमाणे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येतो. अशा परिस्थितीत ज्या जिनींग व्यावसायकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून ३५०० ते ४ हजार रुपयांप्रमाणे प्रतिक्विंटल माल खरेदी केला होता. तेच जिनींग व्यावसायीक व व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर आपला माल आता विक्रीसाठी आणत आहेत.

हा माल आणताना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी केले जाते. मात्र, प्रत्यक्षात माल जिनर्स व व्यापाऱ्यांचा असतो. ३५०० ते ४ हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केलेला माल सीसीआयच्या केंद्रावर ४८०० ते ५ हजार रुपयांप्रमाणे विक्री केला जात आहे. हा प्रकार अनेक केंद्रावर सुरू असून, या हेराफेरीतून व्यापारी चांगलाच नफा कमवत आहेत. तर, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला निकषांचा अडथळा -

सीसीआयच्या केंद्रावर माल विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला मोठ्या प्रमाणात निकषाचा सामना करावा लागत आहे. दर्जा कमी झाला आहे, कवडीचे प्रमाण जास्त आहे, अशा प्रकारचे कारणे देत शेतकऱ्यांना कमी भाव दिला जात आहे. दरम्यान, सीसीआयच्या केंद्रावर येणारा माल हा शेतकऱ्यांचा आहे की व्यापाऱ्यांचा हे पाहण्याचे काम आमचे नाही. कापूस खरेदीसाठी बाजार समितीत नोंदणी सुरू असते. बाजार समितीत नोंदणी झाल्यानंतर त्याठिकाणी ज्या शेतकऱ्यांची नावे आमच्यापर्यंत येतात. त्यांचाच माल सीसीआय खरेदी करत असते, असे स्पष्टीकरण सीसीआयचे केंद्रप्रमुख पन्नालाल सिंग यांनी याबाबत बोलताना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.