ETV Bharat / state

coronavirus : विदेशवारीची माहिती लपवल्याने अमळनेरच्या दाम्पत्यावर गुन्हा - Hiding foreign tour

या दाम्पत्याला सद्यस्थितीत 15 दिवसांसाठी स्वयंम विलिनीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांना कोरोनाची लक्षणे नसली तरी आरोग्य पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमळनेरात आतापर्यंत 2 दाम्पत्य व एक तरुण असे 5 जण परदेशात गेले होते. त्यांना सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाय म्हणून 15 दिवसासाठी स्वयंम विलिनीकरण करण्यात आले आहे.

Jalgaon
विदेशवारीची माहिती लपवल्याने अमळनेरच्या दाम्पत्यावर गुन्हा
author img

By

Published : Mar 21, 2020, 10:23 AM IST

जळगाव - परदेशवारीची माहिती लपवल्याने दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना अमळनेर येथे घडली. अमळनेर येथील एक दाम्पत्य थायलंड व बँकॉक येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, ही बाब ते लपवत होते. कोरोनाबाबत तपासणी करणाऱ्या पथकापासून त्यांनी खरी माहिती लपविली तसेच शासनाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. कोरोना संदर्भात दाखल झालेला हा गुन्हा राज्यातील पहिला गुन्हा मानला जात आहे.

या दाम्पत्याला सद्यस्थितीत 15 दिवसांसाठी स्वयंम विलीनीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांना कोरोनाची लक्षणे नसली तरी आरोग्य पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमळनेरात आतापर्यंत 2 दाम्पत्य व एक तरुण असे 5 जण परदेशात गेले होते. त्यांना सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाय म्हणून 15 दिवसासाठी स्वयंम विलिनीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - #codid19: जळगावातील मुक्ताई संस्थानातील एकादशी वारी रद्द...

हे दाम्पत्य 15 मार्चला विदेशातून अमळनेरला आले होते. विदेशातून आलेल्या व्यक्तींनी दक्षता म्हणून कोरोना तपासणी करण्याबाबतचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, त्यांनी ही माहिती लपवून ठेवली. कोरोना व्हायरसच्या वैद्यकीय तपासणीसाठी पथक 2 ते 3 वेळा त्यांच्याकडे गेले असता, त्यांनी पुणे येथे गेलो असल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर पोलीस तपासात ते विदेशात गेल्याचे समोर आले. पोलिसी खाकी दाखवताच आम्ही थायलंड व बँकॉक येथे फिरण्यासाठी गेलो असल्याचे त्यांनी कबूल केले.

शासनाची दिशाभूल केली म्हणून, प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या निर्देशानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी या दाम्पत्याविरुद्ध साथरोग अधिनियमन 1897 च्या अंमलबजावणीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जळगावात हँड सॅनिटायझर, मास्कचा काळाबाजार; नागरिकांची लूट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.