ETV Bharat / state

धारागीर गावाजवळ कारला भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

author img

By

Published : Oct 15, 2020, 8:57 PM IST

गुरुवारी दुपारी एक कार एरंडोल शहराकडून धुळ्याच्या दिशेने जात असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Car crash near Dharagir village in jalgaon
धारागीर गावाजवळ कारला भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

जळगाव- भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील धारागीर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला. अपघात इतका भीषण होता की वेगामुळे कार तीन ते चार वेळा उलटली.

गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान एक कार एरंडोल शहराकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. कारमध्ये दोन जण बसलेले होते. कारचा वेग अधिक असल्याने कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. वेगामुळे दुभाजक तोडून कार तीन ते चार वेळा उलटून रस्त्याच्या पलीकडे गेली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. ते कोठून आले होते, कोठे जात होते, याचीही माहिती मिळाली नाही.

हा अपघात घडल्यानंतर धारागीर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही जखमींना एरंडोल येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातात कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवल्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेसंदर्भात एरंडोल पोलिसांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी रस्त्यावर उलटलेली कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेसंदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.