ETV Bharat / state

जळगावातील काबरा कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी; लॉकडाऊनमध्ये दररोज भागवताहेत 100 गरिबांची भूक! - kabara family provide food

जळगावातील पुरुषोत्तम काबरा हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नी सुधा काबरा यांना सामाजिक कार्याची आवड आहे. लॉक डाऊनमुळे शहरातील अनेक गोरगरीब कुटुंबीयांची परवड होत असल्याचे पाहून त्यांनी अशा गरजूंची भूक भागविण्याचा निर्णय घेतला. सुधा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजसेवेची संधी मिळणार असल्याने पुरुषोत्तम यांनी त्यांना पाठबळ दिले.

kabara family
जळगावातील काबरा कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी; लॉक डाऊनमध्ये दररोज भागवताहेत 100 गरिबांची भूक!
author img

By

Published : May 11, 2020, 1:11 PM IST

जळगाव - 'समाजाचे आपण काही देणं लागतो', या भावनेतून जळगावातील काबरा कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. लॉकडाऊनमध्ये ते दररोज सकाळी आणि रात्री मिळून सुमारे 100 गोरगरिबांना स्वेच्छेने घरपोच जेवण देत आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्त्वातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लॉक डाऊननंतरही गरजूंसाठी आपण हा उपक्रम सातत्याने पुढेही राबवणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

सुधा काबरा

जळगावातील पुरुषोत्तम काबरा हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नी सुधा काबरा यांना सामाजिक कार्याची आवड आहे. लॉक डाऊनमुळे शहरातील अनेक गोरगरीब कुटुंबीयांची परवड होत असल्याचे पाहून त्यांनी अशा गरजूंची भूक भागविण्याचा निर्णय घेतला. सुधा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजसेवेची संधी मिळणार असल्याने पुरुषोत्तम यांनी त्यांना पाठबळ दिले. एवढंच नाही तर काबरा दाम्पत्याची मुले मयंक आणि आस्था यांनीही आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला सहमती देत आपल्या परीने शक्य ती मदत करण्याची हमी दिली. त्यानंतर काबरा कुटुंबीयांनी सेवाभाव जपण्याचा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला. जळगावात असे अनेक कुटुंब आहेत की, ज्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेल्या गरजू कुटुंबांना किराणा माल उपलब्ध करून दिला तरी ते स्वयंपाक करू शकत नाहीत. अशा कुटुंबांची प्राधान्याने निवड करून सुधा काबरा यांनी मदत करायला सुरुवात केली. सकाळी 50 आणि रात्री 50 अशा 100 कुटुंबांसाठी त्या सात्त्विक जेवण तयार करून त्याचे डबे घरपोच नेऊन देत आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही माध्यमातून प्रसिद्धी न करता मार्च महिन्यापासून त्यांचा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.

kabara family
जळगावातील काबरा कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी; लॉक डाऊनमध्ये दररोज भागवताहेत 100 गरिबांची भूक!
सुधा काबरा दररोज सकाळी आणि रात्री आपल्या कुटुंबियांसाठी जेवण तयार करत असतानाच गरजूंसाठीही जेवण तयार करतात. जेवण तयार झाले की डबे बांधणे ते गरजूंना घरपोच वितरित करणे, या कामात त्यांना पती पुरुषोत्तम काबरा, मुलगा मयंक आणि मुलगी आस्था यांची मदत होते. सकाळी आणि रात्री ते गरजूंना अगदी वेळेवर डबे पोचवतात. लॉक डाऊनसारख्या कठीण काळात काबरा कुटुंबीय मदतीला धावून आल्याने गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, काबरा कुटुंबीयांच्या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

समाजकार्यात असतो सुधा काबरा यांचा सहभाग-

सुधा काबरा या उच्चशिक्षित असून समाजकार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. 'बॉक्स ऑफ हेल्प' नावाची एक सेवाभावी संस्था देखील त्या चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून त्या किशोरवयीन मुलींसाठी काम करतात. किशोरवयीन मुलींचे विविध प्रश्न, त्यांच्या शारीरिक व मानसिक समस्या सोडवण्यासाठी 'बॉक्स ऑफ हेल्प' संस्था काम करते. याशिवाय महिला सबलीकरणासाठीही अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.