ETV Bharat / state

गांजा, दारू पार्टीला विरोध केल्याने टोळक्याचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला; जळगावच्या वाकोदची घटना - जामनेर

शेतात सुरू असलेल्या गांजा, दारू पार्टीला विरोध केल्याच्या रागात 5 ते 6 जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्यावर लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. 5 ते 6 तरुणांच्या टोळक्याने चंद्रे दाम्पत्यावर लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यात संतोष, त्यांच्या पत्नी वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा मुलगा नितीनला देखील जबर मारहाण झाली आहे.

गांजा, दारू पार्टीला विरोध केल्याने टोळक्याचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला; जळगावच्या वाकोदची घटना

author img

By

Published : Apr 8, 2020, 9:48 PM IST

जळगाव - शेतात सुरू असलेल्या गांजा, दारू पार्टीला विरोध केल्याच्या रागात 5 ते 6 जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्यावर लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत दाम्पत्यासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोदला घडली आहे. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

गांजा, दारू पार्टीला विरोध केल्याने टोळक्याचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला; जळगावच्या वाकोदची घटना

संतोष रामराव चंद्रे, वैशाली संतोष चंद्रे तसेच नितीन संतोष चंद्रे (तिघे रा. वाकोद, ता. जामनेर) अशी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पहूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चंद्रे आणि विनोदगीर गोसावी यांचे एकाच शिवारात जवळ जवळ शेत आहे.

संतोष चंद्रे हे कुटुंबीयांसोबत शेतातच राहतात. दरम्यान, विनोदगीर गोसावी यांच्या शेतात काही तरुण गेल्या काही दिवसांपासून रोजच गांजा व दारू पिऊन धिंगाणा घालत होते. संतोष चंद्रे यांनी अनेकदा त्यांना याबाबत समज देखील दिली होती. परंतु, तरीही तरुणांचा धिंगाणा सुरूच होता. 2 दिवसांपूर्वी असाच प्रकार सुरू असताना संतोष चंद्रे यांनी तरुणांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने तरुणांनी अरेरावी करायला सुरुवात केली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने हाणामारी झाली.

5 ते 6 तरुणांच्या टोळक्याने चंद्रे दाम्पत्यावर लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यात संतोष, त्यांच्या पत्नी वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा मुलगा नितीनला देखील जबर मारहाण झाली आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर पहूर पोलिसांनी दखल घेत हल्ल्यात गंभीर जखमी झालेले संतोष चंद्रे यांचा रुग्णालयात जबाब नोंदवून घेत फिर्याद दाखल करून घेतली. त्यानुसार, संशयित आरोपी मुकेश बाजीराव गोसावी, विनोद बाजीराव गोसावी, किरण मुकेश गोसावी, कमलेश गोसावी, कैलासगीर गोसावी, उमेशगीर गोसावी, चिमणगीर गोसावी, सागर गोसावी यांच्यासह अन्य 3 ते 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.